ETV Bharat / entertainment

शाहरुख खान आणि आदित्य चोप्रा पुन्हा 'पठाण 2'साठी एकत्र - शाहरुख खान आणि आदित्य चोप्रा

Pathaan 2 : शाहरुख खान स्टारर 'पठाण' चित्रपटाचा दुसरा भाग 'पठाण 2'चे शुटिंग लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा किंग खान अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.

Pathaan 2
पठाण 2
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2024, 4:09 PM IST

मुंबई - Pathaan 2 : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता शाहरुख खाननं 2023 मध्ये त्याच्या 'पठाण' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई केली होती. हा चित्रपट अनेकांना खूप आवडला होता. आता 'किंग खान'चे चाहते 'पठाण 2' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पठाण' पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुख खान आणि चित्रपट दिग्दर्शकआदित्य चोप्रा 'पठाण 2' चित्रपटसाठी एकत्र येत आहेत. 'पठाण 2' चित्रपटामध्ये पुन्हा एकदा शाहरुख चाहत्यांना अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसेल. दरम्यान यावेळी 'पठाण 2' चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होणार हे समोर आलं आहे.

'पठाण 2'चे शूटिंग कधी सुरू होणार? : 'पठाण 2'च्या नवीन अपडेटवरून असं दिसून आले आहे की, शाहरुख खानच्या चाहत्यांना 'पठाण 2' साठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण 'पठाण 2' चित्रपटाचे शूटिंग 2024च्या अखेरीस सुरू होणार आहे. 'पठाण 2' हा चित्रपट यशराज बॅनरच्या स्पाय युनिव्हर्सचा आठवा चित्रपट असणार आहे. याशिवाय शाहरुख खान आणि सलमान खान स्टारर 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटाचे शूटिंग देखील लवकरच सुरू होणार आहे. यशराज बॅनर येत्या काही वर्षांत आपल्या प्रेक्षकांसाठी एकामागून एक ॲक्शनपॅक्ड चित्रपट देणार आहे. यामध्ये 'पठाण 2', 'वॉर 2' आणि 'टायगर वर्सेस पठाण'चा समावेश आहे.

'पठाण' चित्रपटाबद्दल : 'पठाण' चित्रपटानं देशांतर्गत 654.28 कोटीची कमाई केली. यानंतर जगभरात या चित्रपटानं 1,050.30 कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट 225 कोटी बजेटवर बनवण्यात आला होता. या चित्रपटामध्ये शाहरुखशिवाय, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, मानसी टॅक्सक, एकता कौल, आशुतोष राणा आणि मनीष वाधवा हे कलाकर प्रमुख भूमिकेत दिसले आहेत. याव्यतिरिक्त 'पठाण'मध्ये सलमान खाननं कॅमियो केला आहे. 'किंग खान'साठी 2023वर्ष खूप चांगले होते. त्याचा 'पठाण'नंतर आलेला चित्रपट 'जवान' देखील बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. याशिवाय 'डंकी'ने देखील रुपेरी पडद्यावर चांगली कमाई केली.

हेही वाचा :

  1. अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी'नं ओटीटीवर केला विक्रम
  2. 'शैतान' चित्रपटामधील आर. माधवनचं नवीन पोस्टर रिलीज
  3. 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाचा ट्रेलर सलमान खान आणि राम चरणने केला लॉन्च

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.