ETV Bharat / entertainment

शाहरुख खानची बॉलिवूडमध्ये 32 वर्षे, जाणून घ्या त्याच्या हिट चित्रपटांबद्दल - SHAH RUKH KHAN - SHAH RUKH KHAN

Shah Rukh Khan 32 years bollywood : बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान उद्या बॉलिवूडमध्ये 32 वर्षे पूर्ण करेल. आता आपण या लेखातून त्याच्या हिट चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत.

Shah Rukh Khan 32 years bollywood
शाहरुख खानला बॉलिवूडमध्ये 32 वर्ष होईल पूर्ण (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 5:23 PM IST

मुंबई - Shah Rukh Khan 32 years bollywood : बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान उद्या म्हणजेच 25 जून 2024 रोजी बॉलिवूडमध्ये 32 वर्षे पूर्ण करणार आहे. शाहरुख खानचा पहिला चित्रपट 'दीवाना' हा 25 जून 1992 रोजी रिलीज झाला होता. शाहरुखचा हिंदी चित्रपटसृष्टीतील तीन दशकांचा प्रवास खूपच सुंदर राहिला आहे. त्याला अनेकदा अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. मागील अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर, शाहरुखनं 2023 मध्ये 'पठाण' या ॲक्शन चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर पुनरागमन केलं होतं. 'किंग खान'नं या 32 वर्षात अभिनेता म्हणून 76 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

शाहरुख खानचे आतापर्यंतचे चित्रपट : त्यानं 29 चित्रपटांमध्ये कॅमिओ केला आहेत. शाहरुख खाननं 75 पैकी 25 हून अधिक हिट चित्रपट दिले आहेत. यात त्याचा पहिला चित्रपट 'दीवाना' देखील आहे. 'दीवाना'नंतर शाहरुख खानच्या हिट लिस्टमध्ये 'बाजीगर', 'डर', 'करण अर्जुन', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कोयला', 'येस बॉस', 'देश', 'दिल तो पागल है', 'कुछ कुछ होता है', 'मोहब्बतें', 'कभी खुशी कभी गम', 'कल हो ना हो', 'डॉन', 'चक दे ​इंडिया', 'ओम शांती ओम', 'माय नेम इज खान', 'डॉन 2', 'चेन्नई एक्सप्रेस', 'हॅपी न्यू इयर', 'दिलवाले, पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटांचा समावेश आहे. शाहरुख खाननं ज्या चित्रपटांमध्ये कॅमिओ केला आहे त्यातील निम्म्याहून अधिक चित्रपट हिट झाले आहेत. यामध्ये सलमान खान स्टारर 'टायगर 3'चाही समावेश आहे.

शाहरुख खाननं केली होती छोट्या पडद्यापासून सुरुवात : बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी शाहरुख खाननं 1988 मध्ये छोट्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवले होते. शाहरुखनं 'फौजी' आणि 'दिल दरिया' (1988), 'उमेद', 'महान कर्ज', 'वागले की दुनिया' (1989), 'सर्कस' 'इडियट' आणि 'दूसरा केवल' (1989) मध्ये काम केलंय. शाहरुख हा 2024 मध्ये कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. त्यानं 2023 मध्ये 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी'बरोबर हिट्सची हॅट्ट्रिक केली होती. तेव्हापासून 'किंग खान' आराम करत आहे. शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'किंग' आणि 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. कल्की 2898 एडी: अमिताभ बच्चन यांनी मागितली प्रभासच्या चाहत्यांची माफी, जाणून घ्या कारण - Amitabh Bachchan Seeks Apology
  2. 'कल्की 2898 एडी'ची ॲडव्हान्स बुकिंग सुरू, रिलीजपूर्वी भारतात 6 कोटीची केली कमाई - kalki 2898 ad
  3. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर मद्यधुंद हनी सिंगनं झहीर इक्बालला दिला इशारा - HONEY SINGH

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.