ETV Bharat / entertainment

रवीना टंडनवर दारूच्या नशेत वृद्ध महिलेवर हल्ला केल्याचा आरोप, लोकांनी रस्त्यावर घेरलं - RAVEENA TANDON - RAVEENA TANDON

Raveena Tandon : रवीना टंडनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता रवीना टंडनवर दारूच्या नशेत वृद्ध महिलेवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर तिला काही लोकांनी घेरल्याचं दिसत आहे.

Raveena Tandon
रवीना टंडन (रवीना टंडन फोटो (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 5:24 PM IST

मुंबई - Raveena Tandon : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सध्या तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. रवीनावर एका वृद्ध महिला आणि त्याच्या कुटुंबावर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिनं काल रात्री दारूच्या नशेत असताना त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप पीडितनं केला असून अशा वागण्यामुळे अनेकजण तिच्यावर टीका करत आहेत. रवीनाला यावेळी स्थानिक लोकांनी घेरलं होत. व्हायरल व्हिडिओत रवीना ही दिसत आहे. ही संपूर्ण घटना गेल्या शनिवारी रात्री घडली, मिळालेल्या माहितीनुसार, रवीनाच्या ड्रायव्हरवर निष्काळजीपणे गाडी चालवून रिझवी कॉलेजजवळ कार्टर रोडवर तीन जणांना धडक दिल्याचं आरोप केला गेला आहे.

रवीना टंडनवर केला गेला आरोप : मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रवीना टंडनच्या घराजवळ गाडी रिव्हर्स घेत असताना तिच्या ड्रायव्हरकडून झाली आहे. यादरम्यान ड्रायव्हरचा काही लोकांशी वाद झाला. बाहेरचा आवाज ऐकून रवीना टंडन बाहेर आली आणि तिनं लोकांना समजवण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र काही लोकांनी तिला घेरलं. यानंतर रवीनावर मारहाण केल्याचा आरोप लावण्यात आला होता. यावेळी उपस्थित लोकांनी रवीनाबरोबर धक्काबुक्कीही केली.

रवीनाचा व्हिडिओ व्हायरल : हा वाद वाढल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली. रवीनाच्या ड्रायव्हरची विचारपूस करण्यात आली आहे. दरम्यान दोन्ही पक्षांना खार पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आलं आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही आणि वाहनांची टक्कर झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सध्या कोणत्याही पक्षानं तक्रार दाखल केलेली नाही. व्हिडिओमध्ये रवीना "मला धक्का देऊ नकोस... प्लीज मला मारू नका" असे म्हणताना ऐकू येत आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूचे लोक मुंबईतील पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. महिलांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून यात रवीनाचा कोणताही दोष नसल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे. रवीनाच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'वेलकम टू द जंगल' आणि 'टाइम मशीन'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगचे फोटो शनाया कपूरनं केले शेअर - SHANAYA KAPOOR
  2. सुशांत सिंहच्या स्मृतीदिनानिमित्त बहीण श्वेता कीर्तीनं केदारनाथला दिली भेट, शेअर केले फोटो - Sushant Singh Rajput Sister Shweta
  3. प्रीती झिंटा सहा वर्षानंतर बॉलीवुडमध्ये परतणार, पोस्ट शेअर करत दाखवली 'लाहोर 1947'ची झलक - preity zinta share post

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.