मुंबई - Sarfira X Review : अक्षय कुमार अभिनीत 'सरफिरा' हा बहुप्रतिक्षित चित्रपट आज, १२ जुलै रोजी रिलीज झाला. कमल हासनच्या 'इंडियन 2' चित्रपटाबरोबर 'सरफिरा'ची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे. 'कल्की 2898 एडी' आणि 'किल' हे दोन मोठे चित्रपट थिएटरमध्ये सुरू असताना आता हे दोन चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. 'सरफिरा'चे रिलीज होताच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चित्रपटावर प्रतिक्रिया आणि प्रतिक्रिया येत आहेत.
No matter if it gets 5/5 star, or public accept and film grows in box office or no matter even if it cross 200cr net in domestic boxoffice . We Akkians must control our emotions and boycott #Sarfira to save Akshay Kumar from turning into Remake Kumar.
— Aragorn (@bravo_bravooo) July 12, 2024
Maza nhi aaya , paisa waste , copy Kari par over kar diya #Sarfira #AkshayKumar𓃵 #sarfira #AkshayKumar pic.twitter.com/7ge26xkokL
— niya sharma (@niyas_sharma) July 12, 2024
सुधा कोंगारा दिग्दर्शित 'सूरराई पोत्रू' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तमिळ चित्रपटाचा 'सरफिरा' हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची प्रेरणादायी कथा एअर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन जी आर गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित आहे. लवचिकता, दृढनिश्चय आणि जुगाडची ही अनोखी आणि रंजक कथा आहे.
Barring these minor bumps, Sarfira deserves your attention and you will surely be inspired at the end of it! Definitely recommended!! #Sarfira #AkshayKumar𓃵
— Kshamik (@Kshamik4) July 12, 2024
#Sarfira First Half: Nice. Pre-Interval fragment unleashes the true potential of Akshay Kumar, the performer.
— Nishit Shaw (@NishitShawHere) July 12, 2024
All eyes on the Second Half.
अॅक्शन-पॅक्ड 'बडे मियाँ छोटे मियाँ' नंतर 2024 मध्ये अक्षय कुमारचा 'सरफिरा' हा दुसरा महत्त्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटाला सुरुवातीला मिळालेल्या प्रतिक्रिया संमीश्र आहेत. चाहते अक्षयच्या अभिनयाची तारीफ करत आहेत तरीही काही जणांनी त्यानं रिमेक बनवल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. जर तुम्ही सरफिरा पाहाण्याचा विचार करत असाल, तर नेटिझन्स या चित्रपटाबद्दल काय म्हणत आहेत ते वाचा : अक्षयच्या एका चाहत्याने घोषित केलं, "सरफिरा हा अक्षय कुमारचा मास्टरपीस आहे. तो यात खूप काळानंतर चमकला आहे."
Watched now : #Sarfira touched the masterpiece tagline ❤️#AkshayKumar is just ⚡🔥 after a long time.#SarfiraReview #AkshayKumar𓃵 #PareshRawal #Shivanna pic.twitter.com/6fs3ffYoo6
— Ravirajsinh Jadeja (@ravirajsinh_016) July 12, 2024
व्यापार विश्लेषक निशित शॉ यांनी आपल्या समीक्षणात म्हटलंय की, "सरफिरा चित्रपटाचा फर्स्ट हाफ प्रभावी झाला आहे. अक्षय कुमार मध्यांतरानंतर चमकतो आणि त्याचे खरे पराक्रम दाखवतो. सर्वांच्या नजरा दुसऱ्या हाफवर आहेत."
Akshay Kumar delivers yet another standout performance in #Sarfira.❤️#AkshayKumar𓃵 brings depth & charisma to his character, captivating audiences from start to finish.🔥
— BaBa (@BabaToBolega) July 12, 2024
The film expertly blends humor & drama, showcasing @akshaykumar’s ability to navigate both with ease.🫡 pic.twitter.com/QZx0oR3VdO
"या चित्रपटाला 5/5 स्टार मिळाले, किंवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर लोकप्रिय झाला आणि चित्रपट हिट ठरला किंवा देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा ओलांडला तरी काही फरक पडत नाही. आम्ही अक्कियांनी आमच्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि सरफिरावर बहिष्कार टाकला पाहिजे. अक्षय कुमारला रिमेक कुमार बनण्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला हा कठोर निर्णय घ्यावा लागेल", असं एका चाहत्यानं निराश होऊन म्हटलंय. आणखी एका प्रेक्षकानं नाराजी नोंदवताना म्हटलंय, "मजा नहीं आया, पैसा कचरा, कॉपी करी पर ओव्हर कर दिया."
याउलट, एक वेगळे मत समोर आले आहे: "काही किरकोळ अडथळे वगळता, सरफिरा तुमचे लक्ष वेधण्यास पात्र आहे आणि शेवटी तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल! निश्चितपणे हा चित्रपट पाहावा यासाठी शिफारस करत आहे!!"
दरम्यान, एका युजरनं चित्रपटाचं कौतुक केले आणि लिहिले, "सरफिरा अक्षय कुमारच्या उत्कृष्ट अभिनयाची साक्षीदार आहे. तो त्याच्या भूमिकेत खोली आणि आकर्षकपणा आणतो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुंदर. चित्रपट सहजतेने विनोद आणि नाट्याचं मिश्रण करतो. अक्षयच्या अष्टपैलू अभिनयाचं प्रदर्शन करतो."
अक्षयचा 'सरफिरा' हा जीआर गोपीनाथ यांच्या आयुष्यातील घटनांवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त राधिका मर्चंट देखील मुख्य भूमिकेत आहे. सरफिरामध्ये सीमा बिस्वास, परेश रावल आणि जय उपाध्याय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केले आहे.