मुंबई - Sara Ali Khan: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अनेक कारणांमुळे चर्चेत असते. ती तिच्या स्टाईलिश अंदाजामुळे नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड वेगानं व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तिच्या बाजूला विमानात एक एअर होस्टेस आणि दोन कॅप्टन असल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एअर होस्टेसनं चुकून तिच्या महागड्या कपड्यांवर ज्यूसचा ग्लास सांडला. यानंतर तिला खूप राग आला. तिचा हा व्हिडिओ एका व्यक्तीनं कॅमेऱ्यात कैद केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सारा खान गुलाबी रंगाच्या पोशाखात दिसत आहे.
सारा अली खाननं शेअर केले सुंदर काश्मीरमधील फोटो : गेल्या बुधवारी 24 जुलै रोजी सारा अली खाननं तिच्या काश्मीर व्हेकेशनची झलक इंस्टाग्रामवर शेअर केली होती. सारानं हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "थोडी शांतता." फोटोत तिचे मित्र - मैत्रिणी तेथील स्थानिकांबरोबर चांगला वेळ घालवताना दिसत आहे. याशिवाय ती काश्मीरच्या खोऱ्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. साराचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. अनेकजण या फोटोवर कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या फोटोवर लिहिलं, "सारा तू फोटोमध्ये खूप छान दिसत आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "सारा तुझे डोळे हे अॅपलसारखे आहेत." आणखी एका चाहत्यानं लिहिलं, "काश्मीरसारख्या स्वर्गात सुंदर व्यक्ती." याशिवाय काहीजण या फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून साराचं कौतुक करताना दिसत आहे.
Unexpected turbulence struck Sara Ali Khan’s flight, but not in the way you’d think. An air hostess accidentally spilled juice on Sara’s pricey outfit, sparking quite the in-flight drama. Even celebrities face unexpected mishaps! Want to know what happened next?#SaraOutfitSpill pic.twitter.com/MeCvxfR6ZI
— Aashutosh Sharma (@ashu_pandat_01) July 24, 2024
सारा अली खानचं वर्क फ्रंट : सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटामध्ये दिसली होती. तिचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये साराचा दमदार अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. आता पुढं ती 'मेट्रो...इन दिनों'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर आदित्य रॉय कपूर महत्त्वाच्या भूमिकेत असेल. याशिवाय 'मेट्रो...इन दिनों'मध्ये अली फजल, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, नीना गुप्ता, अनुपम खेर आणि कोंकणा सेन शर्माही असतील. हा चित्रपट 29 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'मेट्रो...इन दिनों' चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनुराग बसूच्या 'लाइफ इन अ मेट्रो'चा सीक्वेल आहे. याशिवाय सारा ही 'लुका चुप्पी 2' आणि 'स्काय फोर्स'मध्ये देखील झळकणार आहे.
हेही वाचा :
- कार्तिक आर्यननं सारा अली, कियाराला नाही तर विद्या बालनला म्हटलं 'फेव्हरेट' अभिनेत्री - Kartik Aaryan Favourite Co Star
- अनन्या, सारा आणि जान्हवी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीसाठी रवाना - Anant Radhika Pre wedding - Anant Radhika Pre wedding
- करण जोहरच्या आगामी चित्रपटात आयुष्मान आणि साराची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार - AYUSHMANN AND SARA ALI KHAN