मुंबई - Sanjay Dutt Birthday: बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त आज 29 जुलै रोजी 65 वर्षांचा झाला आहे. त्याची पत्नी मान्यता दत्तनं संजय दत्तला सकाळीच वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. आता संजय दत्तनं त्याच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. संजय दत्त आता बॉलिवूडपेक्षा साऊथकडील चित्रपटांमध्ये जास्त सक्रिय आहे.त्यानं आज 29 जुलै रोजी त्याच्या आगामी कन्नड चित्रपट 'केडी - द डेव्हिल' मधील फर्स्ट लूक पोस्टर शेअर केलाय. ध्रुव सर्जा स्टारर 'केडी' - द डेव्हिल' हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. या चित्रपटामध्ये रेश्मा, नोरा फतेही, शिल्पा शेट्टी आणि विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.
संजय दत्तचं फर्स्ट लूक : संजय दत्तनं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'केडी' - द डेव्हिल' या चित्रपटातील त्याचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत त्याच्या पात्राचं नावही सांगितलं आहे. संजय दत्तच्या भूमिकेचं नाव 'धक देवा' असणार आहे. संजय दत्तनं फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत या पोस्टवर लिहिलं, "दैत्य लोकशाहीचा देव 'धक देवा', केडीच्या विंटेज रणांगणात उतरला आहे. आता वादळ निर्माण करण्याची वेळ आहे." 'केडी' - द डेव्हिल';च्या या चित्रपटातील संजय दत्तच्या फर्स्ट लूक पोस्टरबद्दल सांगायचं झालं तर तो एका विंटेज कारसमोर उभा आहे. डोक्यावर पोलिसांची टोपी, हातात लाल काठी, गळ्यात पट्टा, प्रिंटचा शर्ट, त्यावर डेनिम जॅकेट, खाली काळी लुंगी, पायात बूट, मोठे केस, दाढी, डोळ्यांवर चष्मा आणि टिळक असलेला संजय दत्त हा वेगळ्या अंदाजात दिसत आहे. आता साऊथमधील त्याचा लूक हा अनेकांना आवडत आहे. 'केडी' - द डेव्हिल' हा चित्रपट केव्हीएन प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. 13 नोव्हेंबरला हा चित्रपट कन्नड भाषेत रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन निर्मिती प्रेम यांनी केलं आहे.
संजय दत्तचे आगामी चित्रपट
'हाऊसफुल 5' - (रिलीज तारीख- 6 जून 2025)
'वेलकम टू द जंगल' - (रिलीझ तारीख- 20 डिसेंबर 2024)
'डबल आय स्मार्ट', - (साऊथ चित्रपट) (रिलीज तारीख-15 ऑगस्ट 2024)
'घुडचडी' – (रिलीज तारीख-9 ऑगस्ट 2024)
'राजा साब' (साऊथ) – (रिलीज तारीख – 13सप्टेंबर 2024)
'सन ऑफ सरदार 2'
'हेरा फेरी 4'
हेही वाचा :