ETV Bharat / entertainment

मान्यता दत्त आणि संजय दत्तच्या लग्नाला 16 वर्ष पूर्ण, जाणून घ्या लव्हस्टोरी - मान्यता दत्त आणि संजय दत्त

Sanjay Dutt 16th Wedding Anniversary: संजय दत्त आणि मान्यता दत्त आज 11 फेब्रुवारी रोजी लग्नाचा 16वा वाढदिवस साजरा करत आहेत. या विशेष प्रसंगी तिनं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

Sanjay Dutt 16th Wedding Anniversary
संजय दत्तच्या लग्नाचा १६वा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 12:51 PM IST

Updated : Feb 11, 2024, 1:08 PM IST

Sanjay Dutt 16th Wedding Anniversary: अभिनेता​​ संजय दत्त आणि अभिनेत्री मान्यता दत्त हे बॉलीवूडच्या लाडक्या जोडप्यांपैकी एक आहेत. आज दोघेही त्यांच्या लग्नाचा 16वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरम्यान, रविवारी, 11 फेब्रुवारी रोजी मान्यता दत्तनं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत पती संजय दत्तला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये हे जोडपे एकत्र खूप सुंदर दिसत आहे. मान्यता दत्तनं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''गोड सोळा! आपल्या आयुष्यातील गोड आणि आंबट अनुभव साजरे करत आहोत. तुझ्यावर खूप प्रेम करते.''

मान्यता नववर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले : दत्त कुटुंबानं 2024 ची सुरुवात मोठ्या उत्साहात साजरी केली. संजय दत्तनं मुलांबरोबर आणि पत्नीसोबत नवीन वर्षाची पार्टी केली. यावेळी त्याची मोठी मुलगी त्रिशाला देखील या पार्टीत उपस्थित होती. मान्यता ही दुबईला राहते. कधी कधी संजय दत्त मुलांना आणि पत्नीला भेटण्यासाठी दुबईला जात असतो. मान्यता अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिला तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. मान्यताची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर तिला 40 लाख लोक फॉलो करतात. मान्यतानं हिंदी चित्रपटसृष्टीत 'प्रस्थानम' , 'संजू' ,'मेरे बाप पहले आप', 'गंगाजल', 'सपूत' , 'लव्हर्स लाइक अस', 'देशद्रोही' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

संजय दत्त-मान्यता प्रेमकहाणी : संजय दत्त आणि मान्यता दत्तची प्रेमकहाणी खूप चर्चेत होती. या जोडप्यानं 2008 मध्ये लग्न केलं. त्यावेळी संजय दत्तच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी येत होत्या. 'लव्हर्स लाईक अस' चित्रपटादरम्यान या जोडप्याची प्रेमकहाणी सुरू झाली. या काळात दोघेही अनेकदा भेटले. मान्यताचा केअरिंग स्वभाव पाहून संजय दत्त तिच्या प्रेमात पडला होता, असं म्हटलं जातं. संजय दत्तनं मान्यतासोबत लग्न केले तेव्हा तो 50 वर्षांचा होता. आता दोघेही दोन मुलांचे पालक आहेत.

हेही वाचा :

  1. कतरिना कैफ बनली चेन्नई सुपर किंग्जची ब्रँड ॲम्बेसिडर
  2. नाशिकमध्ये 'व्हॅलेंटाईन्स डे'निमित्त लव्ह मीटर करणार तुमच्या प्रेमाचे मोजमाप
  3. आदर्श गौरवने 'एलियन्स'च्या शूटिंगला केली सुरुवात, सहकाऱ्यांसह चाखला स्थानिक जेवणाचा स्वाद

Last Updated : Feb 11, 2024, 1:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.