मुंबई - Sangram Singh real Sultan : कॉमनवेल्थ हेवी वेट सुवर्णपदक विजेता संग्राम सिंग 6 वर्षांनंतर कुस्तीत पुनरागमन करत आहे. दुबई प्रो रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये संग्राम सिंग कुस्तीच्या आखाड्यात पाकिस्तानी कुस्तीपटूशी भिडणार आहे. संग्राम सिंग प्रदीर्घ कालावधीनंतर कुस्तीत पुनरागमन करत असल्यामुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याला सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अलीकडेच संग्राम सिंहने सलमान खानला फोनवर संदेश पाठवला की, "तुम्ही चित्रपटाच्या पडद्यावर सुलतानची भूमिका केली आहे आणि मी खऱ्या आयुष्यातील सुलतान आहे. या 40 वर्षांच्या कुस्तीपटूची रिंगमध्ये 23 वर्षांच्या कुस्तीपटूशी जोरदार लढत होईल." संग्राम सिंह सहावर्षानंतर पुन्हा कुस्तीच्या रिंगणात उतरणार असून यंदाच्या दुबई प्रो रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याचा मुकाबला पाकिस्तानी पैलवानाशी होणार आहे. या स्पर्धेत पात्र होण्यासाठी त्यानं आपले वजनही वाढवलं आहे. येत्या 24 फेब्रुवारी रोजी त्याचा पाकिस्तानी पैलवानशी मुकाबला होईल.
संग्राम सिंह हा सलमान खानचा खूप मोठा चाहता आहे. त्याचा असा विश्वास आहे की या देशात सलमान खानसारखा टीव्ही होस्ट नाही. बच्चन साहेब सुद्धा केबीसीचे उत्तम होस्ट करत असले तरी सलमान खान हा एकमेव स्टार आहे ज्याला ज्याची इतर होस्टशी तुलना होऊ शकत नाही. त्याची स्टाईल, त्याचा राग, त्याचे प्रेम, त्याचा समजूतदारपणा, पूर्णतः वेगळा आहे."
संग्राम सिंह बिग बॉस 7 मध्ये स्पर्धक म्हणून आला होता. विशेष म्हणजे या सीझनचा तो विजेता ठरला होता. त्यामुळे सलमान खानशी त्याची बॉन्डिंगही चांगली आहे. दोघांनाही खेळ आवडतो आणि दोघांनाही भारतीय खेळांवर प्रचंड प्रेम आहे.
संग्राम सिंह लवकरच 'उडान जिंदगी की' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट त्याचा व्यावसायिक चित्रपट आहे ज्यामध्ये तो २५ वर्षांच्या तरुण कुस्तीपटूची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट कुस्तीच्या पार्श्वभूमीवर आधारित वडील आणि मुलामधील भावनिक कथा आहे जी आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देईल. हा चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -