मुंबई - अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचं २९ नोव्हेंबर रोजी निधन झालं. सामंथा आणि तिचे वडिल यांचं नातं थोडसं तणावाचं राहिलं होतं. तिनं शिकून मोठं व्हावं अशी इतर सामान्य बापाची जशी इच्छा असते तशीच तिच्या वडिलांचीही होती. परंतु सामंथाच्या मानात काही वेगळंच होतं. याच कारणामुळं दोघांच्यातील नात्यात काहीसा दूरावा निर्माण झाला होता. परंतु ते अतिशय नम्र, शिस्तबद्ध आणि साधेपणा जपणारे व्यक्तिमत्व होतं, याचाही प्रभाव तिच्या व्यक्तिमत्वावर मोठा होता.
सामंथा अभिनेत्री म्हणून यशस्वी होत असताना तिच्या भोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण झालं होतं. परंतु तिच्याबरोबर कधीच तिचे वडिल अवतीभोवती दिसले नाहीत. 2023 मध्ये एका चाहत्यांनं जोसेफ प्रभू यांना सामंथाबरोबर कार्यक्रमात का दिसला नाहीत असं विचारलं असता ते म्हणाले होते, "मला सेलेब्रिटींबरोबर दिसायला आवडत नाही." त्यांच्या या उत्तरातून त्यांची विनयशिलता आणि साधेपणानं जीवन जगण्याला दिलेलं प्राधान्य दिसून येतं.
प्रसिद्धीपासून नेहमी चार हात लांब राहण्याचा जोसेफ प्रभू यांचा निर्णय वेगळा ठरला. खरंतर सामंथा चेन्नईतील आपल्या कुटुंबात जोनाथन आणि डेव्हिड या दोन भावांसह मोठी झाली. आपल्या व्यक्तिमत्व जडणघडणीचं संपूर्ण श्रेय सामंथा आपल्या कुटुंबाला देत आली आहे. परंतु तिच्या वडिलांची वागणूक तिच्या जीवनात शांत परंतु महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणारी होती.
सामंथानं तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून दुःख व्यक्त केलं. 'बाबा, आपली पुन्हा भेट होत नाही तोपर्यंत', असं म्हणत तिनं तुटलेल्या हृदयाचा इमोजी तिनं शेअर केला होता.
2021 मध्ये सामंथाच्या नागा चैतन्यपासून विभक्त झाला. या घटस्फोटाचं दुःख जोसेफ यांना साहजिकपणे झालं. या जोडप्याचा थ्रोबॅक लग्नाचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं होतं, "एकदा, खूप खूप काळी एक गोष्ट होती. ती आता अस्तित्वात राहिली नाही. त्यामुळे एक नवीन गोष्ट नवा अध्याय सुरू होतोय."
सामंथा आणि नागा चैतन्य यांच्यात प्रेमाचं नातं तयार झालं होतं. 2010 मध्ये 'ये माया चेसावे'च्या सेटवर ते पहिल्यांदा भेटले होते. प्रेमात पडल्यानंतर काही काळ एकत्र घालवल्यानंतर त्यांनी 2017 मध्ये लग्न केले. परंतु चार वर्षांनंतर ते वेगळे झाले. मायोसिटिसचे निदान झाल्यानंतर समांथाने तिच्या करिअरवर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. तर चैतन्य आता अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्याबरोबर पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्याची तयारी करत आहे.