सातारा Salman Khan : डीएचएलएफ घोटाळ्यातील वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरातील अलिशान बंगल्यात सलमान खानचं वास्तव्य चर्चेचं ठरलं. काही दिवसांपूर्वी ईडीनं कारवाई करत वाधवान बंधूचा बंगला सील केला होता. तसंच महागडी पेंटींग्ज, फर्निचर जप्त केली होती. सील असताना बंगल्याला वीज, पाण्याची सुविधा पूर्ववत कोणी केली, हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सलमाननं महाबळेश्वर सोडलंय.
आरटीआय कार्यकर्त्याच्या अर्जामुळं प्रशासन अडचणीत : आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान खान महाबळेश्वरला असल्याची चर्चा सुरू झालीय. मात्र, त्याचा मुक्काम वाधवान बंधूच्या सील केलेल्या बंगल्यात असल्याची माहिती सर्वत्र समजली. ईडीनं बंगला सील केला असताना बंगल्यातील वीज, पाण्याची सुविधा पूर्ववत कोणी केली, याची माहिती साताऱ्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी महाबळेश्वरच्या मुख्याधिकाऱ्यांकडं मागवली आहे.
दाट धुक्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या गावी जाण्याचा बेत रद्द : सलमान खान हा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे (ता. महाबळेश्वर) या मूळगावी जाणार होता. परंतु, दाट धुक्यामुळं सलमानला तिकडं जाता आलं नाही. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज सलमानची महाबळेश्वरात भेट घेतल्याची चर्चा आहे. मात्र, दोघांच्या भेटीचे छायाचित्र समोर आलेलं नाही. वाधवान बंधूच्या बंगल्याचे प्रवेशद्वार बंद होतं. तसंच बंगल्याच्या परिसरात वाहनांचा ताफा, पोलीस बंदोबस्त होता.
ईडीनं केला होता वाधवान बंधूचा बंगला सील : डीएचएलएफ घोटाळ्यातील वाधवान बंधूंची महाबळेश्वर येथे मोठी जागा असून त्याठिकाणी दोन-तीन अलिशान बंगले आहेत. त्यातील एक बंगला ईडीनं सील करून तिन्ही बंगल्यातील महागडी पेंटिंग, फर्निचर जप्त केलं होती. सील केलेल्या बंगल्यातच सलमान खानचं वास्तव्य असल्याच समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली. माध्यमांतून चर्चा व्हायला लागताच सलमाननं महाबळेश्वरातूनच काढता पाय घेतला.
हे वाचलंत का :
- "मी खरं बोललो तर अभय देओल तोंड दाखवायला जागा राहणार नाही" : अनुराग कश्यप - ANURAG KASHYAP ON PANKAJ JHA
- "स्वप्न खरं झालं": गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित चित्रपटात सनी देओलबरोबर भूमिका साकारणार सैयामी खेर - Saiyami Kher
- सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाआधी थरारक 'काकुडा'ची रिलीज तारीख जाहीर - Kakuda Release Date