मुंबई - बॉलिवूडचा प्रतिष्ठित स्टार सलमान खान केवळ चित्रपट उद्योगातील उल्लेखनीय योगदानासाठीच ओळखला जात नाही, तर त्याच्या सेवाभावी प्रयत्नांसाठी आणि चित्रकलेवरील प्रेमासाठीही ओळखला जातो. अनेकांना त्याचा हा कलागुण फारसा परिचित नाही, परंतु तो उत्तम पेटिंग करतो असा त्याच्या चाहत्यांना ठाम विश्वास आहे.
आता सलमानने बनवलेलं एखाद पेंटिंग आपल्या ड्रॉइंग रुममध्ये असावं असं एखाद्या चाहत्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी एक नवी संधी सलमानने निर्माण केली आहे. त्यांनं आपल्या कलाकृती त्याच्या चाहत्यांसाठी उपलब्ध आहेत याची खात्री करण्यासाठी आर्टफी या ललित कला कंपनीसोबतची भागीदारी उघड केली आहे. हे पाऊल सलमानच्या सर्जनशील प्रवासातील महत्त्वपूर्ण प्रगती दाखवणारे आहे.
अधिकृत निवेदनानुसार, 'युनिटी 1' आणि 'युनिटी 2' या प्रसिद्ध डिप्टीच पीससह सलमानची पेंटिंग्ज आता पिल्यांदाच फ्रॅक्शनल ओनरशिपद्वारे प्रत्येकासाठी उपलब्ध असतील. या प्रयत्नात आर्टफीसह हातमिळवणी केल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, सलमानने घोषित केले की त्याच्या कलेची सुलभता वाढवण्याच्या या प्रयत्नाचा हा एक भाग असल्यामुळे त्याला खूप आनंद झाला आहे. या उपक्रमामुळे जगभरातील लोकांना त्याच्या कलेचा आनंद घेता येईल याचा त्याला आनंद आहे.
सलमान सध्या त्याच्या 'टायगर 3' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' 12 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आता प्राइम व्हिडिओवर स्ट्रिमिंग होत आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. 'टायगर 3' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल खास बोलतांना सलमानने सांगितले की, "दिवाळीची वेळ होती आणि विश्वचषक चालू होता आणि सर्वांची उत्सुकता त्यात होती, पण तरीही आम्हाला मिळालेले आकडे अप्रतिम आहेत... आम्ही याबद्दल खूप कृतज्ञ आणि आनंदी आहोत."
वर्कफ्रंटचा विचार करता सलमान खान दिग्दर्शक विष्णुवर्धन यांच्या आगामी 'द बुल' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी अद्याप केलेली नाही. सलमानचा सुपरस्टार शाहरुख खानसह आगामी 'टायगर व्हर्सेस पठाण' चित्रपट देखील चर्चेत आहे.
हेही वाचा -