ETV Bharat / entertainment

मुसळधार पावसात फुटबॉल खेळताहेत रितेश-जेनेलियाची मुलं, जेनेलिया म्हणते, 'रोखणं अशक्य आहे' - Genelia kids playing footbal - GENELIA KIDS PLAYING FOOTBAL

जेनेलियानं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिची मुले फुटबॉलचा सराव करत आहेत. व्हिडिओ शेअर करण्याबरोबरच तिनं एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 7:41 PM IST

मुंबई - बॉलिवूडपासून ते साऊथ चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री जेनेलिया देशमुख सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिनं आपल्या मुलांचा पावसात खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. जेनेलियानं इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये तिची मुलं रायन आणि राहिल पावसात मैदानात फुटबॉल खेळताना दिसत आहेत.

Genelia Deshmukh Instagram Story Post
जेनेलिया देशमुख इन्स्टग्राम स्टोरी पोस्ट ((Instagram))

व्हिडिओ शेअर करताना, जेनेलियानं कॅप्शनमध्ये लिहिले की, "पाऊस... सकाळी 6 वाजता उठणे... सकाळी 7 वाजता सराव करणे... त्यांना कोणीच थांबवू शकत नाही... मुलं प्रयत्न करत आहेत आणि तेच महत्त्वाचे आहे." अभिनेत्री जेनेलिया राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू आहे, तिनं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती आणि ती पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एका व्यावसायिक जाहिरातीत दिसली होती.

जेनेलियाने 3 फेब्रुवारी 2012 रोजी अभिनेता रितेश देशमुखबरोबर लग्न केले. दोघांनी लग्नाआधी नऊ वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. त्यांची हैदराबादमध्ये तुझे मेरी कसा या रितेशच्या पदार्पणाच्या सेटवर पहिली भेट झाली होती. त्यांनी पहिल्यांदा पारंपारिक मराठी रितीरिवाजांनुसार आणि नंतर ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षांनी 2014 मध्ये या जोडप्याला त्यांचा पहिला मुलगा रायन झाला आणि त्यानंतर दोन वर्षांनी 2016 मध्ये मुलगा राहिलचा जन्म झाला.

कामाच्या आघाडीवर बोलायचं झालं तर जेनेलिया तिच्या आगामी 'सीतारे जमीन पर' या आगामी चित्रपटाची तयारी करत आहे. यामध्ये ती आमिर खान आणि दर्शील सफारीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'ज्युनियर' हा तेलुगू चित्रपटही आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त अभिनेत्रीने तमिळ, तेलुगू, कन्नड, मराठी आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.