मुंबई - Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी 5' हा शो काल 28 जुलै रोजी हा प्रसारित झाला. या शोला पाहण्यासाठी अनेकजण आतुर होतेच, कारण यावेळी या सीझनची होस्टिंग हा सर्वाचा लाकडा अभिनेता रितेश देशमुख करणार होता. आता बिग बॉस मराठी 5'ची सुरुवात खूप धमाकेदार झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोण स्पर्धक घरात एंट्री करणार याविषयी अनेकांना उत्सुकता लागली होती. या शोमध्ये 16 स्पर्धकांची एंट्री केली. यावर्षी स्पर्धकांसाठी बिग बॉसचं घर सुंदर सजविण्यात आलं आहे. बिग बॉसच्या घरात काही ओळखीचं चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळाले.
'बिग बॉस मराठी 5'मधील स्पर्धक : या शोमध्ये मराठी सिनेसृष्टीतील ड्रीमगर्ल वर्षा उसगावकर, अभिनेता निखिल दामले, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर , अभिनेत्री योगिता चव्हाण, अभिनेता पंढरीनाथ कांबळे, अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, गायक अभिजीत सावंत, राजकीय मंचावर सभा गाजवणारा घनश्याम दरवडे, अभिनेत्री इरिना रूडाकोवा, डोंबिवलीची हॉट मराठी मुलगी निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, स्प्लिट्सव्हिला स्टार अरबाज पटेल , रॅप स्टार आर्या जाधव, महाराष्ट्राचा लाडके किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील, उद्योजक आणि प्रसिद्ध रील स्टार धनंजय पोवार आणि टिक टॉक स्टार सूरज चव्हाण हे आता बिग बॉसच्या घरात धमाका करणार आहे.
रितेश देशमुखचा वेगळा अंदाज : 'बिग बॉस मराठी 5' आता प्रेक्षकांना रोज रात्री 9 वाजता जिओ सिनेमा आणि कलर्स मराठीवर पाहता येणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये प्रेक्षकांना रितेश देशमुख स्टाईल पाहायला मिळणार आहे. याआधी 'बिग बॉस मराठी'चं होस्टिंग ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी केलं होतं. त्यांनी होस्टिंग केले चारही सीझन खूप लोकप्रिय झाले होते. 24 तास ड्रामा सुरु असणाऱ्या 'बिग बॉस मराठी 5'च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं मनोरंजक असणार आहे. आता हा शो बाकी चार सीझनपेक्षा जास्त लोकप्रियता मिळवेल असं अनेकजण प्रतिक्रिया देऊन सांगताना दिसत आहेत.