ETV Bharat / entertainment

ऐकलंत का 'बिग बॉस मराठी'चं नवं गाणं, 'आला रे आला... भाऊचा धक्का'? - Bigg Boss Marathi - BIGG BOSS MARATHI

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी 5'चं नवीन गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये रितेश देशमुखची अनोखी स्टाईल पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi Season 5
बिग बॉस मराठी 5 (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 5:36 PM IST

Updated : Aug 3, 2024, 5:42 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी सीझन 5' हा सध्या खूप चर्चेत आहे. यावेळी या शोचं होस्टिंग आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख करत असलयानं, या सीझनमध्ये खूप काही प्रेक्षकांना वेगळे पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस मराठीचा सीझन 5' हा 28 जुलै रोजी प्रसारित झाला. आता या शोला चांगलीचं लोकप्रियता मिळत आहे. 'बिग बॉस मराठीचा सीझन 5' हा तब्बल 2 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच आठवड्यात सर्व स्पर्धक प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करताना दिसत आहे. यावेळी बरेच ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यापूर्वीचे चार सीझन खूप लोकप्रिय झाले होते. दरम्यान बिग बॉस मराठी 5'चं नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'बिग बॉस मराठी सीझन 5'मधील गाणं रिलीज : या गाण्याचे बोल "लपून सारी, बघून बारी, डोक्यात त्याच्या गेलंय, साऱ्यांना टाईट, करणार राईट, हिशोब त्यानं केलाय, हटके स्टाईल, किलर स्माईल, धिंगाणा याचा करंलाय," असे आहेत. हे गाणं कुठल्याही चित्रपटातील नसून रियालिटी शो 'बिग बॉस मराठी'चं नवं गाणं आहे. आता रितेश भाऊ कोणाला धडा शिकवेल आणि कोणाचं कौतुक करेल हे वीकेंडला समजेल. 'बिग बॉस' हा रियालिटी शो जगभरात आणि भारतात अनेक भाषांमध्ये खेळला जातो. या शोला प्रेक्षकांचे अफाट प्रेम मिळते. 'बिग बॉस मराठी' या शोसुद्धा प्रेक्षकचं खूप प्रेम मिळालं आहे. बिग बॉसमध्ये स्पर्धकांना सकाळी उठविण्यासाठी विविध गाणी लावली जायची. मात्र गेल्या काही पर्वांपासुन 'बिग बॉस'मध्ये प्रत्येक सीझनला एक खास गाणं बनवले जाते. हे गाणं सकाळी स्पर्धकांना झोपेतून उठवण्यासाठी लावले जाते.

रितेश देशमुखची अनोखी स्टाईल : यापूर्वी 'बिग बॉस मराठी'चे होस्टिंग महेश मांजरेकर हे करत होते. दरम्यान या सीझनचं नवीन गाणं खूप धमाकेदार आहे. सध्या रितेश भाऊंची अनोखी स्टाईल आणि 16 स्पर्धकांचा हटके खेळ हा चाहत्यांना खूप आवडत आहे. या 'भाऊच्या धक्क्या'त सदस्यांची पोलखोल होणार आहे. 'भाऊचा धक्का' या गाण्यात रितेश भाऊचा रुबाब पाहायला मिळत आहे. त्याची हटके स्वॅग स्टाईल आणि उत्साह या गाण्याला आकर्षक बनवत आहे.यावेळी 'भाऊचा धक्का' चांगलाच गाजणार आहे हे नक्की आहे. 'बिग बॉस मराठी 5' रोज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर आणि जीओ सिनेमावर पाहायला मिळेल.

हेही वाचा :

  1. रितेश देशमुखनं केलं 'बिग बॉस मराठी सीझन 5'मध्ये 16 स्पर्धकांचं स्वागत - Bigg Boss Marathi 5
  2. 'बिग बॉस मराठी 5' मध्ये कोणते सेलिब्रिटी स्पर्धक असणार? ग्रँड प्रिमिअरनंतर आजपासून सुरू होणार शो - bigg boss marathi season 5
  3. रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी' सीझन 5 करणार होस्ट, प्रोमो झाला रिलीज - Riteish Deshmukh

Last Updated : Aug 3, 2024, 5:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.