मुंबई- Richa Chadha and Ali Fazal: अभिनेत्रा रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल सध्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. या जोडप्यानं 16 जुलै रोजी आपल्या घरी बाळाचे स्वागत केले. तेव्हापासून हे जोडपे त्यांच्या मुलाच्या वेळापत्रकाची पूर्ण काळजी घेत आहेत. रिचानं अलीकडेच अलीबरोबरचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दोघेही शाहरुख खानच्या गाण्यावर मस्ती करताना दिसत आहेत. 27 जुलैला रोजी रात्री उशिरा रिचा चड्ढानं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला.
अली फजल आणि रिचा चड्ढाचा व्हिडिओ व्हायरल : व्हिडिओमध्ये तिचा पती अली फजलही खूप धमाल करताना दिसत आहे. बाळामुळे दोघांना रात्री जागरण करावं लागत आहे . व्हिडिओमध्ये रिचा शाहरुखच्या 'कुछ कुछ होता है' मधील 'ये लडका है दिवाना' या हिट गाण्यावर लिप सिंक करताना दिसत आहे. तर अली पार्श्वभूमीत मजेदार डान्स करत आहे. दरम्यान या व्हिडिओवर सैफ अली खानची बहीण सबानंदेखील प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्यानं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, "छान कॉम्बिनेशन." दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, "तुमच्या दोघांसाठी खूप छान वाटत आहे." आणखी एकानं लिहिलं ,"खूप चांगली जोडी आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून या जोडप्यावर अभिनंदानाचा वर्षाव करत आहेत.
अली फजल आणि रिचा चड्ढाचं वर्कफ्रंट : रिचा चढ्ढा अलीकडेच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. ही वेब सिरीज अनेकांना आवडली होती. यामध्ये रिचाबरोबर मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, शर्मीन सहगल, संजीदा शेख या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. आता 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सीरीजचा दुसरा पार्ट हा चाहत्याच्या भेटीला येणार आहे. दुसरीकडे अली फजल अलीकडेच 'फुकरे 3' मध्ये 'जफर'च्या भूमिकेत परतला होता. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर त्याची पत्नी रिचा चड्ढा , वरुण शर्मा, पुलकित सम्राट, पंकज त्रिपाठी, मनजोत सिंग आणि अमित धवन हे कलाकार दिसले होते. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.
हेही वाचा :