मुंबई - Rhea Chakraborty : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि व्हीजे रिया चक्रवर्ती आज 32वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 1 जुलै 1992 रोजी कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे झाला. ती चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. रिया तिच्या प्रेमप्रकरणामुळेही अनेकदा वादात सापडली आहे. 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातही तिला अटक करण्यात आली होती. आजही ती या कायदेशीर अडचणीतून बाहेर पडू शकलेली नाही. या सगळ्यातही तिनं हिंमत हारली नाही. 'एमटीवी रोडीज 19 कर्म या कांड''मध्ये परीक्षक बनून तिनं पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनं जिंकल होतं.
रिया चक्रवर्ती सापडली होती वादात : रिया चक्रवर्तीबद्दल अफवा होती की, तिचे आणि आदित्य रॉय कपूरचं अफेअर होते. मात्र तिनं लव्ह लाईफबद्दल उघड केलं होत की, ती सुशांत सिंग राजपूतबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. रिया चक्रवर्तीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, ती अभिनेत्री होण्यापूर्वी ती एमटीवी इंडियावर व्हीजे होती. तिनं 2012 मध्ये 'तुनिगा तुनिगा' नावाच्या तेलुगू चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर तिनं 2013 मध्ये 'मेरे डॅड की मारुती'मध्ये या बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू केला. तसेच तिला अनेक चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या.
रिया चक्रवर्ती : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर तिचे नाते त्याच्या मृत्यूनंतर आणखी चर्चेत आले होते. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला एक महिना तुरुंगात काढावा लागला होता. हा काळ तिच्यासाठी खूप कठिण होता. रिया चक्रवर्तीनं एक तेलुगू आणि सात हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. अलीकडेच ती सोनू सूदच्या 'रोडीज 19: कर्म या कांड' या रिॲलिटी शोमध्ये जज म्हणून दिसल्यानंतर चर्चेत आली होती. या सीझनमध्ये रियाच्या गटातील वाशू जैननं हा शो जिंकला होता. तसेच रिया चक्रवर्ती आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्यातील अफेअर आणि वादाची चर्चा झाली होती. रिया 2013 मध्ये यशराज फिल्मच्या सेटवर पहिल्यांदा सुशांतला ती भेटली होती. दोघांनी एप्रिल 2019 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.
हेही वाचा :
- गायक अभिजीत भट्टाचार्यनं सलमान खानच्या हिट गाण्याबाबत केला धक्कादायक खुलासा - SINGER ABHIJEET BHATTACHARYA
- डेब्यू प्रोडक्शन 'क्रॅक'सह करोडो गमावल्यानंतर विद्युत जामवाल फ्रेंच सर्कसमध्ये झाला सामील - VIDYUT JAMMWAL
- 'बालिका वधू' फेम अविका गोरनं 'या' चित्रपटातून केलं होत तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण - avika celebrating her birthday