ETV Bharat / entertainment

रतन टाटा यांचं निधन झाल्यानंतर एक्स गर्लफ्रेंड सिमी ग्रेवाल यांनी केली भावनिक पोस्ट शेअर

Ratan Tata Demise: रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांची एक्स गर्लफ्रेंड ज्येष्ठ अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनी दु:ख व्यक्त केल आहे.

Ratan Tata Demise
रतन टाटा यांचं निधन (रतन टाटा- सिमी ग्रेवाल (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 10, 2024, 12:11 PM IST

मुंबई : रतन टाटा यांनी वयाच्या ८६व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांच्या निधनानं संपूर्ण देश हादरला आहे. आता सोशल मीडियावर अनेकजण त्यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत आहे. रतन टाटा यांच्या निधनावर राजकारण, व्यवसाय, क्रीडा, मनोरंजन आणि परदेशातील बड्या व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, रतन टाटा यांना एकेकाळी ज्या एका अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, आता या अभिनेत्रीनं रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना आपला खास मित्र म्हटलंय. रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना सिमी यांनी त्यांच्या नावानं एक एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

रतन टाटा एक्स गर्लफ्रेंड सिमी ग्रेवाल यांची पोस्ट : सिमी यांनी प्रसिद्ध चॅट शो Rendezvous with Simi Garewal मधून रतन टाटाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सिमी पांढऱ्या कोटमध्ये आणि रतन टाटा काळ्या सूटमध्ये दिसत आहे. रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना सिमी यांनी लिहिलं आहे की, 'ते म्हणतात की तू गेलास, पण तुझ्या जाण्यानं झालेली हानी कधीच भरून येणार नाही, अलविदा माझ्या मित्रा.' रतन टाटा यांच्या प्रेमकहाणीबद्दल बहुतेकांना माहिती नाही. त्यांना सिमी ग्रेवाल यांच्याबरोबर लग्न करायचे होते. ही गोष्ट त्या दिवसांची आहे, जेव्हा 1962 मध्ये भारत-चीन युद्ध सुरू होते. त्यावेळी रतन टाटा यांची विशेष ओळख नसल्यानं हे लग्न होऊ शकले नाही.

रतन टाटा आणि सिमी ग्रेवाल यांचं नात : रतन टाटा आणि सिमी ग्रेवाल हे अनेकदा डेटवरही भेटले होते. लग्न न झाल्यानं त्याचं नातं तुटलं. यानंतर दोघेही चांगले मित्र राहिले. रिपोर्ट्सनुसार, सिमी ग्रेवाल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "रतन टाटाबरोबर माझे नाते बरेच दिवस टिकले, ते एक अद्भुत व्यक्ती आहेत, त्यांचा सेंस ऑफ ह्यूमर अप्रतिम आहे, त्यांची पैसा ही पहिली पसंती कधीच नव्हती, ते भारतापेक्षा परदेशात उघडपणे जगत होते." दरम्यान रतन टाटा स्वतः सिमी यांच्या शोचा भाग राहिले आहेत. यावेळी या शोद्वारे त्यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.