ETV Bharat / entertainment

रश्मिका मंदान्नाने मिलान फॅशन वीक 2024 पूर्वी दाखवली तिच्या ग्लॅम ग्राइंडची झलक - रश्मिका मंदान्ना

Rashmika at Milan Fashion Week 2024 रश्मिका मंदान्ना इटलीतील प्रतिष्ठित मिलान फॅशन वीक 2024 मध्ये सहभागी होणार आहे. यासाठी तयार होत असतानाची एक झलक तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या कार्यक्रमात रश्मिका अभिनेता ओनित्सुका टायगरची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करेल.

Rashmika Mandanna
रश्मिका मंदान्ना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 5:34 PM IST

मुंबई - अभिनेत्री रश्मिका मंदान्ना इटलीतील प्रतिष्ठित मिलान फॅशन वीक 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा फॅशन वीक सोहळा मंगळवारी सुरू झाला आणि सोमवारपर्यंत चालणार आहे. यामध्ये रश्मिका ओनित्सुका टायगरची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करेल. या भव्य प्रसंगी प्रख्यात ब्रँड्सच्या तीन नाविन्यपूर्ण सर्जनशील तपशीलांसह इटालियन फॅशनमध्ये होत गेलेल्या प्रगतशील बदलांचे आणि सुसंस्कृतपणाचे प्रतीक म्हणून प्रदर्शन केले जाईल.

Rashmika Mandanna
रश्मिका मंदान्ना

रश्मिका मंदान्ना इटलीतील प्रतिष्ठित मिलान फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यापूर्वी मेकअप रुममध्ये तयार होत असतानाची एक झलक तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. पांढरा बाथरोब परिधान केलेली रश्मिका खुर्चीवर बसून कार्यक्रमासाठी तयार होताना दिसत आहे. तिने 'ओनित्सुका टायगर' लिहिलेला एक लिफाफा आणि पिवळ्या फुलांचा पुष्पगुच्छ देखील धरलेला दिसत आहे.

ओनित्सुका टायगरने 2023 मध्ये रश्मिका मंदान्ना यांना त्यांची पहिली भारतीय ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले. रश्मिकाने मिलान फॅशन वीकमध्ये ब्रँडच्या ऑटम/विंटर 2023 शोकेसला देखील हजेरी लावली. तत्पूर्वी, रश्मिकाने तिचा उत्साह व्यक्त केला. ती म्हणाली की, ओनित्सुका टायगरसोबत सहयोग करण्यास मला आनंद होत आहे कारण त्यांचा समकालीन संग्रह तिच्या वैयक्तिक स्टाईलशी पूर्णपणे मॅच होणारा आहे. रश्मिकाने पुढे जोर दिला की हा ब्रँड तिला फॅशन-फॉरवर्ड ट्रेंड आणि डिझाईन्स एक्सप्लोर करताना तिच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध करुन देतो.

मिलान फॅशन वीकमध्ये सहभागी होत असताना कामाच्या आघाडीवर ती खूप बिझी अभिनेत्री आहे. ती 'पुष्पा: द राइज - पार्ट 1' या चित्रपटाच्या यशानंतर 'पुष्पा 2: द रुल' या बहुप्रतिक्षित सिक्वेलमध्ये काम करण्यासाठी सज्ज आहे. सुकुमार दिग्दर्शित, हा चित्रपट लाल चंदन तस्करीच्या बेकायदेशीर दुनियेत एका सामान्य मजुराची बलाढ्य होण्याची कथा कथन करतो. यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. याव्यतिरिक्त, रश्मिकाच्या हातामध्ये 'द गर्लफ्रेंड', 'छावा' आणि 'इंद्रधनुष्य' सारखे प्रोजेक्ट आहेत.

हेही वाचा -

  1. विद्या बालनच्या नावे बनावट इन्स्टा अकाऊंट बनवून फसवणूक; गुन्हा दाखल
  2. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्समध्ये शाहरुखने मारली बाजी
  3. माफियांचा बंदोबस्त करणाऱ्या युपी मुख्यमंत्र्याची भूमिका साकारणार मनोज जोशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.