ETV Bharat / entertainment

मिलान फॅशन वीकमध्ये जपानी ब्रँडसाठी रॅम्पवर अवतरली रश्मिका मंदान्ना - मिलान फॅशन वीक

प्रतिष्ठीत मिलान फॅशन वीकमध्ये रश्मिका मंदान्ना काळ्या रंगाच्या पोशाखात रेड कार्पेटवर अवतरली होती. तिने इंस्टाग्रामवर या कार्यक्रमातील फोटोंची मालिका पोस्ट केली आहे.

Rashmika Mandanna Dazzles at Milan Fashion Week
मिलान फॅशन वीकमध्ये रश्मिका मंदान्ना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 3:42 PM IST

मुंबई - रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या 'अ‍ॅनिमल'मध्ये यशस्वी झळकल्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या जगभरात फॅशन सीनवर आपली छाप सोडण्यात गुंतली आहे. बुधवारी मिलान फॅशन वीक 2024 मध्ये रश्मिका दिमाखात सहभागी झाली. तिने ओनित्सुका टायगर या जपानी फॅशन ब्रँडसाठी रेड कार्टेवर उवतरली होती. विशेष म्हणजे, रश्मिका फॅशन लेबलची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.

Rashmika Mandanna
रश्मिका मंदान्ना पोस्ट

मिलानमधील फॅशन इव्हेंटमध्ये उपस्थित असताना तिचा स्लीक ब्लॅक सूट आणि मॅचिंग ब्लॅक बूट्स दाखवण्यासाठी रश्मिका मंदान्नाने तिच्या इनस्टाग्राम स्टोरीचा आधार घेतला आहे. 20-26 फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या मिलान फॅशन वीक 2024 मध्ये रश्मिकाने रॅम्पवॉक करताना लांब काळा कोट असलेला काळा ड्रेस घातला होता.

Rashmika Mandanna Dazzles at Milan Fashion Week
मिलान फॅशन वीकमध्ये रश्मिका मंदान्ना

तिने इन्स्टाग्राम स्टोरीजवर फॅशन शोमधील फोटोंची एक स्ट्रिंग शेअर केली आणि लिहिले: "एक मिनिटासाठी मिलान." रश्मिकाने फॅशन शोमधील स्वतःचा आणखी एक फोटो शेअर केला, तिच्या ङेअर स्टाईल आणि मेकअप टीमला टॅग करत, कॅप्शनसह तिने लिहिले: "जेव्हा या मुली माझ्यावर जादू करतात..." रश्मिकाने फॅशन शोमध्ये रॅम्पवॉकवर चालत असलेल्या मॉडेल्सचे फोटो देखील टाकले आहेत.

दरम्यान, रश्मिकाने अलीकडेच मुंबईहून हैदराबादला उड्डाण करताना एका अत्यंत क्लेशकारक इन-फ्लाइट अनुभवाबद्दल एका पोस्टमधून खुलासा केला होता. यामध्ये तिच्यासोबत सहप्रवासी म्हणून अभिनेत्री श्रद्धा दास होती. एका संभाव्य अपघाताचा प्रसंग ओढवला असताना तिला श्रद्धा दासने केलेल्या मदतीचा उल्लेख केला होता. रश्मिका आणि श्रद्धा मुंबईहून हैदराबादला विमानाने जात असताना, अनपेक्षित तांत्रिक आव्हानांमुळे, विमान 30 मिनिटांनंतर उतरावे लागले होते.

कामाच्या आघाडीवर रश्मिका तिच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या यशाने आनंदित आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. 'अ‍ॅनिमल' हा २०२३ मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक होता आणि 'अ‍ॅनिमल पार्क' नावाच्या सिक्वेलची प्रतीक्षा आता प्रेक्षक करत आहेत. रश्मिका लवकरच अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा: द रुल' नावाच्या 'पुष्पा २' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

  1. इमरान हाश्मी 'डॉन 3'मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार का? सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
  2. रश्मिका मंदान्नाने मिलान फॅशन वीक 2024 पूर्वी दाखवली तिच्या ग्लॅम ग्राइंडची झलक
  3. ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या सर्वांचे गुलजार यांनी मानले आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.