ETV Bharat / entertainment

रश्मिका मंदान्नानं चाहत्याकडून स्वीकारला लाल गुलाब, 'नॅशनल क्रश'वर कौतुकाचा वर्षाव - रश्मिका मंदान्ना

Rashmika Mandanna Accepts Rose : रश्मिका मंदान्नाच्या केवळ अभिनयासाठीच नव्हे तर तिच्या प्रेक्षकांशी ठेवत असलेल्या उत्तम रिलेशनसाठीही ओळखली जाते. अलिकडे मुंबई भेटीदरम्यान तिच्या एका चाहत्यानं लाल गुलाब भेट दिला. त्याचा स्वीकार तिनं आनंदनानं केला आहे.

Rashmika Mandanna
रश्मिका मंदान्ना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 4:56 PM IST

मुंबई - Rashmika Mandanna Accepts Rose : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना नेहमी तिच्या चाहत्यांशी आपुलकीनं वागते आणि त्यांच्याशी संपर्कातही राहण्याचा प्रयत्न करते. तिच्या नातं जपण्याच्या या सवयीमुळं तिनं एका भाग्यवान चाहत्याकडून गुलाब स्वीकारला आणि शनिवारी इंटरनेटवर ऑनलाइन खळबळ उडवून दिली. अलिकडे मुंबईच्या भेटीवर आलेल्या रश्मिकानं पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' या चॅट शोच्या शूटिंगसाठी मुंबई शहरात आलेली असताना रश्मिकाने फ्लेर्ड डेनिम आणि सोनेरी कानातल्यासह क्रॉप जॅकेटमध्ये सुशोभितपणे वेषभूषा केली होती. नेहाच्या शोच्या शूटिंगपूर्वी, तिनं पापाराझींसह फोटोसाठी प्रेमळ पोज दिली.

उत्स्फूर्त फोटो सत्रादरम्यान, एका चाहत्याने रश्मिकाला लाल गुलाब देऊ केलं असता तिनं त्याचा खूप प्रेमानं स्वीकारला. चाहत्याने अगदी हाताने हार्ट हावभाव केले त्यालाही रश्मिकाने प्रतिसाद दिला. या गोड संवादाचा व्हिडिओ त्वरीत व्हायरल झाल्यानंतर, नेटिझन्सनी रश्मिकाच्या नम्र वर्तनाचे कौतुक केले आहे. भाग्यवान चाहत्यासोबतचा रश्मिकाचा व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर लगेचच, त्यावर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, तिच्या साधेपणाबद्दल, लोकांच्या मिसळण्याच्या वृत्तीबद्दल खूप कौतुक केलंय. याच कारणासाठी ती 'नॅशनल क्रश' असल्याचंही एकानं म्हटलंय.

चित्रपटाच्या आघाडीवर, रश्मिकाचा अलिकडेच 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट गाजला होता. यात तिनं गीतांजली ही रणबीर कपूरच्या पत्नीची व्यक्तीरेखा साकारली होती. तिनं अलीकडेच विकी कौशलसह 'छावा' या पीरियड ड्रामा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सध्या ती 'पुष्पा: द रुल' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतली आहे. अलिकडेच रश्मिकानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर 'पुष्पा' चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांचा फोटो शेअर केला होता. दिग्दर्शक सुकुमार सिंहाच्या पुतळ्याजवळ हात टेकून उभा राहिला असताना मंदान्नाने त्याचा फोटो क्लिक केला आहे. सुकुमारनं फोटोसाठी दिलेल्या पोजचे तिने कॅप्शनमधून कौतुक केलं होतं. याशिवाय 'द गर्लफ्रेंड' आणि 'इंद्रधनुष्य' हे दोन्ही तेलुगू चित्रपट रश्मिका मंदान्नाच्या हातात आहेत.

हेही वाचा -

  1. वडिलांच्या नावानं बांधलेल्या स्मारकाच्या उद्घाटनावेळी रवीना टंडन झाली भावूक
  2. 'छावा'च्या शूटिंगमध्ये हात फ्रॅक्चरही होऊन विकी कौशलची जिद्द, म्हणाला "थांबू शकत नाही"
  3. "हिंमत नही छोडना, बस्स !" आनंद महिंद्रा यांनी सरफराज खानच्या वडिलांना ऑफर केली थार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.