ETV Bharat / entertainment

'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये रणवीर शौरीनं यूट्यूबर लवकेश कटारियाला दिलं नवीन नाव... - ranvir shorey - RANVIR SHOREY

Bigg Boss OTT 3 :'बिग बॉस ओटीटी 3' हा शो सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये अभिनेता रणवीर शौरीनं यूट्यूबर लवकेश कटारियाला कार्टून असल्याचं म्हटलं.

Bigg Boss OTT 3
बिग बॉस ओटीटी 3 (ranvir shorey and luv kataria - instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 12:24 PM IST

मुंबई - Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी सीझन 3' सुरू झाला आहे. यावेळी अनिल कपूर या शोला होस्ट करत आहे. अभिनेते, यूट्यूबर्स आणि मीडिया इंफ्लूएंसर्स यांच्यात ट्रॉफीसाठी शर्यत असल्याचं दिसतंय. दरम्यान अभिनेता रणवीर शौरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तो शोमध्ये उपस्थित असलेल्या एका यूट्यूबरला कार्टून म्हणताना दिसत आहे. आता हा व्हिडिओ पाहून चाहतेही त्याला पाठिंबा देत आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रणवीर कुटुंबातील सदस्यांच्या योगदानाबद्दल बोलताना दिसत आहे. यानंतर तो लवकेश कटारियाबद्दल म्हणतो, "गेल्या दोन दिवसांत लवकेश या घरात विष पसरवणं आणि टोमणं मारण्याशिवाय काही योगदान देत नाही."

रणवीर शौरीचा व्हिडिओ व्हायरल : यावर लवकेश काही बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा बाकी उपस्थित असलेले कलाकार त्याला कार्टून आणि शून्य असल्याचं म्हणतात. तसेच रणवीरनं पुढं म्हटलं, "बाहेरील लोकांना दाखवण्यासाठी काहीही बोलत राहतो. त्याचं योगदान शून्य आहे. या व्हिडिओला बिग बॉसच्या पेज वरून व्हिडिओ शेअर करण्यात आलं आहे. आता या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका यूजरनं लिहिलं की, "रणवीर बरोबर आहे." दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं की, "आता घरातील लोकांनाही माहित आहे की लव कटारिया हा बॅक्टेरिया आहे." आणखी एकानं यूजरनं लिहिलं, "कार्टून एकदम परफेक्ट आहे." या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन लवकेशच्या विरोधात बोलताना दिसत आहेत.

लवकेश कटारियाला मिळालं नवीन नाव : 'बिग बॉस ओटीटी 3'च्या पेजवर शेअर केलेल्या पोस्टवर त्यांनी लिहिलं, "रणवीर विरुद्ध कटारिया!!!! रणवीर म्हणतो की तुझे युट्युब व्हिडिओ कोण पाहतात माहित नाही." लवला यावेळी कार्टून म्हटलं गेलं. तुम्ही सहमत आहात का? " सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये रणवीर शौरी आणि लवकेश कटारिया व्यतिरिक्त अरमान मलिक त्याची पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिक देखील उपस्थित आहेत. तसेच या शोमध्ये सना सुलतान, मुनिषा खटवानी, पत्रकार दीपक चौरसिया , विशाल पांडे, भारतीय बॉक्सर नीरज गोयत, शिवानी कुमारी, साई केतन राव, पौलोमी पोलो, सना मकबुल, चंद्रिका गेरा दीक्षित आणि सोनम खान या कलाकरांचा देखील समावेश आहेत.

हेही वाचा :

  1. 'तेरे मस्त मस्त दो नैन'वर थिरकले नवविवाहित सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल - Sonakshi Sinha wedding reception
  2. सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बालच्या रिसेप्शनला अवतरलं तारांगण, सलमान खानची दिमाखदार एन्ट्री - SONAKSHI ZAHEER WEDDING
  3. करण सिंग ग्रोव्हरनं दोन अयशस्वी घटस्फोटबद्दलचा केला खुलासा - karan singh grover breaks silence

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.