मुंबई - अभिनेता रणवीर सिंग गेल्या काही दिवसांपासून त्याच्या छोट्या परीबरोबर क्वालिटी टाइम घालवत होता. आता तो पुन्हा एकदा आपल्या शूटिंगच्या कामाला सुरूवात करणार आहे. गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी रणवीर सिंगनं सोशल मीडियावर त्याचा एक फोटो पोस्ट केला होता. या लेटेस्ट फोटोने त्याच्या चाहत्यांना वेड लावलं आहे.
26 सप्टेंबर रोजी रणवीर सिंगने स्वतःचा एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणवीर सिंग त्याच्या शरीराचा आकार आणि स्नायूंचं सौष्ठव दाखवताना दिसत आहे. लांब केस आणि दाढीमध्ये रणवीर खूपच सुंदर दिसत आहे. रणवीरने हा फोटो जिममध्ये क्लिक केला आहे.
कुटुंबाबरोबर दर्जेदार वेळ घालवल्यानंतर रणवीरनं त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या कामाची तयारी सुरू केली आहे. फरहान अख्तरच्या बहुप्रतिक्षित 'डॉन ३' मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाशी संबंधित एका व्यक्तीनं सांगितलं की, चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन अजूनही सुरू आहे. त्याची तयारी येत्या मार्चपासून सुरू होणार आहे. त्यानं पुढं असंही सांगितले की तो रणवीर त्याच्या आगामी अनटाइटेड चित्रपटात बिझी झाला आहे. अलिकडेच तो वडील झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात आनंदाचा नवा बहर आल्याचं पाहायला मिळालं होतं.
8 सप्टेंबर रोजी रणवीरची पत्नी-अभिनेत्री दीपिका पदुकोणनं एका मुलीला जन्म दिला. या जोडप्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली. या जोडप्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी नवीन पालक झालेल्या रणवीर-दीपिकाला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.
हेही वाचा -
- शाहरुख खाननं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नवजात कन्येला दिली भेट, व्हिडिओ व्हायरल - SHAH RUKH Meets DEEPIKAS BABY GIRL
- 'डॉन 3'साठी शूटिंग लोकेशनच्या शोधात लंडनमध्ये पोहोचला फरहान अख्तर - Farhan Akhtar Don 3
- सिद्धिविनायक पावला; दीपिका -रणवीरच्या घरी गणेशोत्सवात आली 'लक्ष्मी' - Ranveer Deepika first child