ETV Bharat / entertainment

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाल्यानंतर रणदीप हुड्डानं केल्या भावना व्यक्त - Randeep Hooda - RANDEEP HOODA

Randeep Hooda: रणदीप हुड्डाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार सोहळ्यानंतर त्यानं मीडियासमोर आनंद व्यक्त केला.

Randeep Hooda
रणदीप हुड्डा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 12:29 PM IST

मुंबई Randeep Hooda : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता रणदीप हुड्डा सध्या रिलीज झालेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. दरम्यान बुधवारी 24 एप्रिल रोजी मुंबईतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात रणदीप हुड्डाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कारानं सन्मानित झाल्याबद्दल रणदीपनं म्हटल, "हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. मला अनेक दिग्गजांबरोबर सन्मानित केलं गेलं ही माझ्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट आहे. सावरकर, मंगेशकर कुटुंब खूप जवळचे होते आणि या बायोपिकवर काम करणे माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट होती."

'स्वातंत्र्य वीर सावरकर' बायोपिक : 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेले स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी इंग्रजांविरुद्ध कमालीची लढाई लढली होती. दरम्यान 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाचं दिग्दर्शन रणदीप हुड्डानं केलं आहे. याशिवाय त्यानं या चित्रपटामध्ये सावरकरांची भूमिकाही साकारली आहे. या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे आणि अमित सियाल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 22 मार्च रोजी हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.

अमिताभ बच्चन यांना मिळाला पुरस्कार : 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट 20 कोटीमध्ये तयार करण्यात आला आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सुमारे 24 कोटी रुपयांची कमाई केली. रणदीपचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. दरम्यान रणदीपनं या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. त्यानं त्याचं वजन देखील कमी केलं होतं. दरम्यान, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. मुंबईत आयोजित या कार्यक्रमात बच्चन यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलं. मंगेशकर भावंडांमध्ये तिसऱ्या मोठ्या गायिका उषा मंगेशकर यांनी बच्चन यांना हा पुरस्कार प्रदान केला.

हेही वाचा :

  1. 'हीरामंडी' प्रीमियरमध्ये अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ दिसले एकत्र, व्हिडिओ व्हायरल - ADITI RAO HYDARI AND SIDDHARTH
  2. महानायक अमिताभ बच्चन लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित, पुरस्कार मिळताच म्हणाले... - Lata Mangeshkar Award
  3. 'नाच गं घुमा' सिनेमातील स्त्री प्रत्येक घरातील स्त्रीचं प्रतिनिधित्व करते, मुक्ता बर्वेची प्रतिक्रिया - Mukta Barve

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.