ETV Bharat / entertainment

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमधला रणबीर कपूरची मुलगी 'राहा'चा गोड फोटो व्हायरल - RANBIR KAPOOR DAUGHTER RAHA - RANBIR KAPOOR DAUGHTER RAHA

RANBIR KAPOOR DAUGHTER RAHA : आलिया आणि रणबीरची मुलगी राहा यांच्याबद्दल चाहत्यांमध्ये खूप क्रेझ आहे. त्यामुळेच तिची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झालेले असतात. अलीकडेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला रणबीर कपूर आणि आलिया हजर होती. दोघंही चिमुकल्या राहाबरोबर इटलीत फिरतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

RANBIR KAPOOR DAUGHTER RAHA
रणबीर कपूरची मुलगी राहा (IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 17, 2024, 5:30 PM IST

मुंबई - RANBIR KAPOOR DAUGHTER RAHA : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट्टची मुलगी राहा हिचे आधीपासूनच खूप चाहते आहेत. त्यामुळे राहाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झालेले आहेत. नुकताच रणबीर राहाबरोबर इटलीच्या रस्त्यावर फिरताना दिसला. या फोटोत दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. रणबीर अनेकदा आपल्या मुलीबरोबर वेळ घालवताना दिसतो.

राहा वडील रणबीरबरोबर इटलीच्या रस्त्यावर भटकतानाचा फोटो

रणबीर आलियाची जोडी अलीकडेच इटलीतील क्रूझवर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सहभागी होताना दिसली. या सेलिब्रेशनचे अनेक न पाहिलेले फोटो ऑनलाइन समोर आले आहेत. त्यापैकी एक फोटो रणबीर आणि राहा यांचा आहे. यामध्ये दोघेही इटलीच्या रस्त्यावर फिरताना दिसले. चाहत्यांनी हे पाहताच कमेंट सेक्शनमध्ये वडील आणि मुलीच्या या गोड फोटोवर भरपूर प्रतिक्रिया आणि प्रेमही व्यक्त केले होते. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनं 6 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12:05 च्या सुमारास एका मुलीचे स्वागत केलं होतं. आलियाने तिच्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये गर्दी केली आणि नवीन पालकांसाठी रेड हार्ट इमोटिकॉन आणि अभिनंदन संदेश टाकले होते.

आलिया तिच्या प्रीगर्स डायरीमधून तिच्या चाहत्यांना तिच्या गरोदरपणात वारंवार गोड फोटो देत होती. या जोडप्याने 14 एप्रिल 2022 रोजी रणबीरच्या मुंबईतील निवासस्थानी एका समारंभात अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांची लग्नगाठ बांधली होती.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलैला लग्न करणार आहेत. याआधी पार पडलेल्या या जोडप्याचा जामनगर येथेील प्री वेडिंग सोहळ्यात मेटा संस्थापक मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी, बॉलिवूडचे तिन्ही खान शाहरुख, सलमान आणि आमिर खान उपस्थित होते. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पॉप स्टार रिहानाला त्यांच्या मुलाच्या लग्नाआधीच्या उत्सवात आमंत्रित केलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांनी रिहानाला मानधन म्हणून 74 कोटी रुपये दिले होते.

हेही वाचा -

अनंत-राधिका प्री-वेडिंग फंक्शनसाठी सलमान खान रणबीर, आलिया आणि धोनीसह इटलीला रवाना - Anant Radhika Pre Wedding

प्रभास अभिनीत 'कल्की 2898 एडी'मधील पहिलं गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ - kalki 2898 ad

अल्लू अर्जुननं नाकारला ॲटलीचा चित्रपट, सलमान खानची झाली एंट्री - allu arjun

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.