मुंबई Ranbir kapoor : अभिनेता रणबीर कपूर गेल्यावर्षीपासून 'ॲनिमल' चित्रपटामुळे भारतीय बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. 2023 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'ॲनिमल' चित्रपट आहे. रणबीरचा 'ॲनिमल' हा करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी, रणबीर कपूरचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'संजू' होता. 'ॲनिमल' चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करून एक इतिहास रचला आहे. चाहते आता 'ॲनिमल'च्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. आता 'ॲनिमल पार्क'बद्दल एक मोठी अपडेट आली आहे. ही अपडेट वाचून कोणालाही धक्का बसू शकतो.
'ॲनिमल पार्क' रणबीर कपूर सोडणार? : रणबीर कपूर 'ॲनिमल पार्क' सोडू शकतो. अलीकडेच रणबीर कपूरची पत्नी आलिया भट्टचा 'जिगरा' चित्रपट प्रदर्शित झाला. 'जिगरा' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत आहे. याशिवाय टी-सीरीजचे मालक भूषण कुमारची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या कुमार खोसलानं सोशल मीडियाद्वारे आलिया भट्टवर निशाना साधला आहे. 'जिगरा'च्या कमाईत अतिशयोक्ती केल्याबद्दल दिव्यानं आलियाची खरडपट्टी एका पोस्टच्या माध्यामातून काढली होती. आता दिव्याच्या या टोमण्यावर रणबीर आणि आलिया नाराज असल्याचं बोललं जात आहे. एका रिपोर्टनुसार रणबीर हा 'ॲनिमल पार्क' चित्रपट करणार नाही. 'ॲनिमल' या चित्रपटाचे निर्माते दिव्याचे पती आणि टी-सीरीजचे मालक भूषण कुमार आहेत.
#RanbirKapoor Husband of #AliaBhatt is working on Animal Park which is produced by Bhushan Kumar's T-Series whose wife Divya Khosla posted an Inst story defaming Alia.
— Vishesh (@kedia_vishesh) October 12, 2024
Now let's see if this ALPHA MALE on the screen stands for his wife and backs out from Animal Park or not.#Jigra… pic.twitter.com/RpOm0dGKGS
दिव्या खोसला कुमारची पोस्ट चर्चेत : दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'ॲनिमल पार्क'वर आता संकटाचे ढग दाटून आले आहेत. 12 ऑक्टोबर रोजी दिव्यानं 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'जिगरा' चित्रपटासंदर्भात एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. यात तिनं म्हटलं होतं, 'मी पाहिलं आहे की, 'जिगरा'ला कोणीही पाहत नाही, थिएटर्स रिकामी पडली आहेत, त्यामुळे आलिया भट्टनं स्वतः 'जिगरा'च्या तिकिटांची खरेदी केली आणि बनावट कलेक्शन दाखवले आहे.' दिव्याच्या या पोस्टवर आलिया आणि रणबीरकडून कोणतेही वक्तव्य आणि प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा :