ETV Bharat / entertainment

रणबीरनं फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या मंचावर पत्नी आलियासोबत केला 'जमाल कुडू'वर डान्स - जमाल कुडू

Ranbir Kapoor And Alia Bhatt : अभिनेता रणबीर कपूरनं 69व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सहाव्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अवार्ड जिंकला आहे. या कार्यक्रमात त्यानं पत्नी आलिया भट्टसोबत धमाकेदार डान्स केला.

Ranbir Kapoor And Alia Bhatt
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2024, 1:42 PM IST

मुंबई - Ranbir Kapoor And Alia Bhatt : अभिनेता रणबीर कपूरनं 28 जानेवारी रोजी झालेल्या 69व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात खूप धमाल केली आहे. या सोहळ्यात रणबीर कपूरनं सहाव्यांदा फिल्मफेअर अवॉर्ड जिंकला आहे. त्यानं फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात जबरदस्त परफॉर्म केला. या अवॉर्ड शोमध्ये रणबीर कपूर पूर्ण फॉर्ममध्ये दिसला. दरम्यान सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या सोहळ्यात रणबीर हा 'ॲनिमल' चित्रपटातील 500 किलोची बंदूक घेऊन स्टेजवर पोहोचला होता. याशिवाय त्यानं या कार्यक्रमात 'जमाल कुडू' गाण्यावर पत्नी अलिया भट्टसोबत डान्सही केला आहे.

रणबीर कपूरची 500 किलोची बंदूक : 69व्या फिल्मफेअर अवॉर्डची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणबीर कपूरचे दोन व्हिडिओ हे त्याच्या चाहत्यांना खूप पसंत पडत आहेत. एका व्हिडिओमध्ये रणबीर कपूरनं 'ॲनिमल' चित्रपटातील 500 किलो वजनाची बंदुक ही स्टेजवर आणली आणि ती चालवताना त्यानं खूप एन्जॉय केलं. 69व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या मंचावरून आणखी एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये'ॲनिमल' चित्रपटातील एंट्री गाणं 'जमाल कुडू'वर रणबीर आणि आलिया डान्स करत बॉबी देओलप्रमाणे डोक्यावर ग्लास ठेवताना दिसत आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टला मिळाला पुरस्कार : 69व्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या मंचावरील या दोन व्हिडिओंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. रणबीर कपूरला 'ॲनिमल' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर आलिया भट्टला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर नीतू कपूरनेही सून आणि मुलाला या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी आलियानं 'गंगुबाई काठियावाडी'साठी राष्ट्रीय पुरस्कार पटकवला आहे. हा पुरस्कार तिनं क्रिती सेनॉनसोबत शेअर केला होता. रणबीर आणि आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'ॲनिमल'मध्ये दिसला होता. आता पुढं तो 'रामायण पार्ट 1', 'लव्ह अँड वॉर', 'ब्रह्मास्त्र पार्ट 2', 'ब्रह्मास्त्र पार्ट 3'मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे आलिया ही 'जिगरा' चित्रपटामध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस सीझन 17' चा विजेता ठरला मुनव्वर फारुकी! काय मिळालं बक्षीस?
  2. अमिताभ बच्चनचा मजेशीर फोटो सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो
  3. 'किलर सूप' वेब सीरीजनं जिंकली चाहत्यांची मनं, मनोज वाजपेयी आहे दुहेरी भूमिकेत!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.