मुंबई - आलिया भट्टची आई सोनी राझदान यांचा वाढदिवस २५ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यासाठी रणबीर आणि आलिया बाहेर पडले होते. सकाळपासून आलिया विचित्रपणे ट्रोल झाली होती. तिला अर्धांगवायू झाल्यामुळे तिनं बोटॉक्स सर्जरी केल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट सकाळपासूनच पसरल्या होत्या. त्यामुळे आलिया भट्टच्या दिवसाची सुरुवात खराब झाली होती. दोघेही जेव्हा रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना हाच प्रश्न तिला विचारण्यात आल्यानं रणबीर कपूर चांगलाच भडकला. पापाराझींच्या मोठ्या गराड्यातून तो निघून गेला.
ऑनलाइन प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये, रणबीर आणि आलिया मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून निघताना दिसत आहेत. त्यांना कॅमेऱ्यात बंद करण्यासाठी पापाराझींची घाई सुरू असल्याचं दिसत. गर्दीतून वाट काढत हे जोडपं आपल्या कारकडे पोहोचला पण एकजण त्यांच्यात घुसून फोटो घेण्याचा प्रत्न करत होता. त्या फोटोग्राफरला रणबीरनं हाताला धरुन "क्या कर रहे हो आप लोग?" अलं म्हणत बाजूला केलं. गाडीमध्ये बसल्यानंतरही त्यांच्यावर कॅमेऱ्याचे फ्लॅश पडतच राहिले.
अकच दिवसापूर्वी रणबीर कपूर संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये दिसला होता. त्यामुले त्याच्या आगामी प्रोजेक्टवरुन बरीच चर्चा सुरू झाली होती. स्टायलिश बेज टी-शर्ट, जीन्स आणि ट्रेंडी एक्सेसरीज घातलेल्या रणबीरनं त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'लव्ह अँड वॉर'साठी मीटिंगमध्ये जाताना आत्मविश्वास व्यक्त केला. या चित्रपटामध्ये आलिया आणि अभिनेता विकी कौशल देखील दिसणार आहेत. या प्रोजेक्टमधून रणबीर आणि भन्साळी पुन्हा एकत्र येणार आहेत. यापूर्वी त्यांनी 2007 मध्ये 'सावरिया' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. भन्साळी यांनी आलिया भट्टला घेऊन गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट केला होता. आता रणबीरला घेऊन चित्रपट बनणार असल्यामुळे दोघांच्याही चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
दरम्यान, आलिया भट्टनं तिच्यावर झालेल्या बोटॉक्स सर्जरीच्या आरोपांना सोशल मीडियावरुन उत्तर दिलं. कामाच्या आघाडीवर आलिया भट्ट आगामी प्रोजेक्ट 'अल्फा'साठी शर्वरी वाघ बरोबर काम करत आहे. रणबीर सध्या नितेश तिवारीच्या महत्वाकांक्षी चित्रपट 'रामायण'च्या शूटिंगमध्ये गुंतला आहे. यामध्ये तो रामाची भूमिका करत असून साई पल्लवी यामध्ये सीतामातेच्या भूमिकेत आहे.