ETV Bharat / entertainment

रणबीर-आलिया ते विकी-कतरिना स्टार कपल प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येत हजर - स्टार कपल

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा जल्लोषात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहिले.

Ram Mandir Pran Pratishtha
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 2:13 PM IST

मुंबई - Ram Mandir Pran Pratishtha : उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळाचा ऐतिहासिक सोहळा आज 22 जानेवारी रोजी थाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. दरम्यान चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्स अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहिले. या ऐतिहासिक सोहळ्याला अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ, रणदीप हुड्डा, लीन लैशराम, माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने ही जोडपीदेखील उपस्थित राहिली. दुपारी 12.30 वाजता श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार सुरु झाला.

प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे साक्षीदार झाली 'ही' कपल्स : बॉलिवूड स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना श्रीराम मंदिराच्या उद्घाटनसाठी निमंत्रण मिळालं होतं. आज सकाळी रणबीर आणि आलिया विमानतळावर स्पॉट झाले. रणबीरनं यावेळी क्रीम रंगाचा धोती कुर्ता परिधान केला होता, तर आलियाने स्काय ब्लू साडी नेसली होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार जोडपं विकी कौशल आणि कतरिना कैफ देखील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे साक्षीदार झाले. विकी आणि कतरिना पारंपरिक पोशाखात राम मंदिर परिसरात दाखल झाले. कतरिना कैफनं सोनेरी रंगाची साडी नेसली होती. तर विकी कौशलनं क्रीम रंगाचा कुर्ता पायजमा या सोहळ्यासाठी निवडला. या लूकमध्ये हे कपल खूप सुंदर दिसत होते.

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने : हिंदी चित्रपटसृष्टीतील 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितही पती डॉ. श्रीराम नेने यांच्याबरोबर श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहिली. या कार्यक्रमात माधुरी दीक्षित पिवळ्या रंगाची साडी नेसून तर डॉ. श्रीराम नेने यांनी क्रीम रंगाचा पायजमा, मरून रंगाचा कुर्ता आणि त्यावर चमकदार जॅकेट असा पेहराव केला होता. नवविवाहित जोडपं रणदीप हुड्डा आणि लीन लैशराम देखील मुंबई विमातळावर स्पॉट झाले. हे कपलदेखील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी झाले.

हेही वाचा :

  1. नोरा फतेहीचा डीपफेक व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल
  2. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी 'हे' सेलिब्रिटी झाले रवाना
  3. सुशांत सिंगची बहिणीसह रिया चक्रवर्तीला एसएसआरची आली आठवण, वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.