ETV Bharat / entertainment

जॅकी भगनानीसह लग्नात रकुल प्रीत सिंगची ब्राइडल एन्ट्री झाली व्हायरल - जॅकी भगनानी

Rakul Preet Singh Bridal Entry : रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात लग्नबंधनात अडकले. रकुलच्या लग्नातील वधू म्हणून झालेल्या एन्ट्रीचा व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे.

Rakul Preet Singh's Bridal Entry
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 12:23 PM IST

मुंबई - Rakul Preet Singh's Bridal Entry : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात एका रोमँटिक सोहळ्यात लग्न केले. या लग्नसोहळ्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून बातम्यांच्या मथळ्याचा विषय बनला होता. आता गोव्यातील लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये रकुल प्रीतची जबरदस्त ब्राइडल एन्ट्री कॅप्चर करण्यात आली आहे. तिच्या लग्नाच्या दिवशी तरुण ताहिलियानीच्या गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात रकुल प्रीत सिंग खूपच आकर्षक दिसत होती.

एका लग्नाच्या व्हिडिओमध्ये रकुल प्रीत वधू रॅम्पवर चालताना दिसत आहे. स्मोकच्या प्रभावाने संपूर्ण दृश्यात स्वप्नवत वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. जसजसे ती चालत पुढे जात होती तेव्हा उपस्थित पाहुणे तिच्या नावाचा जयघोष करताना दिसत होते. यामध्ये बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांचाही समावेश होता.

या जोडप्याचे मुंबईत रिसेप्शन होण्याची शक्यता आहे, यामध्ये फिल्म जगतातील दिग्गज आणि आघाडीचे तारेतारका हजर राहू शकतात. मात्र, रकुल आणि जॅकीने रिसेप्शनची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

बुधवारी सकाळी आणि संध्याकाळी, रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी गोव्यात आनंद कारज आणि दुसरा सिंधी पद्धती अशा दोन वेगवेगळ्या समारंभात लग्नाच्या बंधनात अडकले. रकुल प्रीत आणि जॅकीने त्यांच्या मॅचिंग लग्नाच्या पोशाखातील एक नवीन फोटो देखील शेअर केला आहे. हा फोटो बुधवारी सकाळी पार पडलेल्यात्यांच्या आनंद कारज समारंभातील आहे.

रकुल प्रीत सिंग हस्तिदंती रंगाच्या तरुण ताहिलियानी लेहेंग्यात जबरदस्त दिसत होती, तर जॅकी भगनानी त्याच्या गोल्डन आणि क्रीम आउटफिटमध्ये डॅशिंग दिसत होता. तिने सोन्याचे सुंदर दागिने परिधान केले होते.

लग्नाच्या उत्सवादरम्यान, जॅकीने रकुल प्रीतसाठी एक सरप्राईज गिफ्ट देखील उघड केले. जॅकीने स्वतः लिहिलेले आणि गायलेले 'बिन तेरे' नावाचे हृदयस्पर्शी गाणे रकुलसाठी सरप्राईज होते. रकुल प्रीत आणि जॅकी यांनी बुधवारी त्यांच्या लग्नानंतर चाहत्यांसह अधिकृत लग्नाचे फोटो शेअर केले. नवविवाहित जोडप्याने लग्नानंतर तेथे तैनात असलेल्या पापाराझींशी संवादही साधला.

हेही वाचा -

  1. सलमान खानच्या चेहरा रंगवलेल्या पँटसह फन्की एअरपोर्ट लूकने पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले
  2. "हा नंबर एक पुरस्कार!"; महाराष्ट्र भूषण सन्मानानं गौरवल्यावर अशोक सराफ यांची प्रतिक्रिया
  3. यामी गौतमच्या 'आर्टिकल 370'शी टक्कर असूनही असूनही विद्युत जामवाल स्टारर 'क्रॅक'ची चांगली सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.