ETV Bharat / entertainment

रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी लग्नासाठी पोहोचले गोव्यात; विमानतळावरील व्हिडिओ झाला व्हायरल - रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी

Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding: रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी लग्नासाठी गोव्यात कुटुंबासह पोहचले आहेत. त्याचा विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding
रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीचं लग्न
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 12:23 PM IST

मुंबई- Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding: अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी हे जोडपे 21 फेब्रुवारीला लग्न करणार आहे, ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त काही जवळचे मित्रही सहभागी होणार आहेत. आता हे दोघेही त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी गोव्यात पोहोचले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन्ही स्टार्स त्यांच्या कुटुंबियांबरोबर गोवा विमानतळावर स्पॉट झाले. यावेळी रकुल केशरी रंगाच्या कॉर्ड-सेटमध्ये दिसली, तर जॅकीनं प्रिंटेड टी-शर्ट आणि काळी पॅन्ट परिधानं केली आहे. यावेळी त्याचा विमातळावरचा लूक हा फंकी होता.

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर होईल लग्न : रकुल आणि जॅकी गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर होणार आहे. या जोडप्याचं लग्न इको-फ्रेंडली होईल. त्यांच्या लग्नात कोणत्याही प्रकारचे फटाके फोडले जाणार नाहीत. एवढेच नाही तर रकुल आणि जॅकीनं लग्नाच्या दिवशी झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या दोघांच्या लग्नात 'नो फोन पॉलिसी' असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रकुल आणि जॅकीच्या लग्नात पाहुण्यांना फोन वापरण्याची परवानगी नाही. या जोडप्याला लग्नाची निमंत्रण पत्रिकाही यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर गोव्याच्या समुद्र किनारावर लग्न मंडप होता. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कमेंट्सचा पूर आला आहे.

लॉकडाऊनमध्ये प्रेमकहाणी सुरू झाली : रकुल आणि जॅकीची प्रेमकहाणी कोविडच्या काळात सुरू झाली हे फार कमी लोकांना माहीत आहे. लॉकडाऊन दरम्यान दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांनी 2022 मध्ये त्यांच्या नात्याची पुष्टी केली होती. रकुलनं सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर करून जगासमोर जॅकीसोबतच्या नात्याची कबुली दिली होती. रकुल आणि जॅकी यांनी यापूर्वी परदेशात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नरेंद्र मोदीनं डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातीलचं ठिकाणे निवडा, असे आवाहन केल्यानंतर त्यांनी मायदेशी लग्न करण्याचं ठरविलं. आता चाहते त्यांच्या भव्य लग्नाची वाट पाहात आहेत.

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यन लग्नासाठी तयार! त्याच्या लेटेस्ट फोटोच्या कॅप्शनमुळे फिमेल फॅन्स अस्वस्थ
  2. 'दंगल' गर्ल सुहानी भटनागरचे निधन, धाकट्या 'बबिता फोगट'ने अवघ्या 19 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  3. कार्तिक आर्यन लग्नासाठी तयार! त्याच्या लेटेस्ट फोटोच्या कॅप्शनमुळे फिमेल फॅन्स अस्वस्थ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.