ETV Bharat / entertainment

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या विवाह सोहळ्यामधील मेहेंदी आणि संगीतचे फोटो व्हायरल - रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी

Rakul Preet Jackky Bhagnani Wedding: अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानीचे लग्न आज गोव्यात होत आहे. आता त्यांच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

Rakul Preet Jackky Bhagnani Wedding
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीचं लग्न
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 3:11 PM IST

मुंबई - Rakul Preet Jackky Bhagnani Wedding: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर जोडी रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचे लग्न विधी सुरू आहेत. सध्या सोशल मीडियावर या जोडप्याच्या लग्नाच्या कार्यक्रमामधील काही फोटो व्हायरल झाले आहेत. रकुल-जॅकीच्या संगीत सोहळ्यातून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचे काही फोटो समोर आले आहेत. 20 फेब्रुवारीच्या रात्री रकुल-जॅकीचा संगीत सोहळा झाला. या संगीत सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी दमदार डान्स केला. दरम्यान शिल्पा आणि राजनंेया जोडप्याच्या लग्नात जबरदस्त परफॉर्मन्स दिल्याची बातमी आता समोर येत आहे. 'मुंड्या तू बचाके राही' या बॉलिवूड गाण्यावरील शिल्पा आणि राजच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Rakul Preet Jackky Bhagnani Wedding
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीचं लग्न

लग्नाची विधी सुरू : साऊथ गोव्यातील आयटीसी ग्रँडमध्ये आज हे जोडपे विवाहबद्ध होईल. दुपारी तीनच्या सुमारास हे जोडपे लग्नाचे सात फेरे घेतील. यानंतर हे कपल ग्रँड पार्टी करणार आहे. रकुल आणि जॅकी दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. रकुल शीख धर्माची असून जॅकी सिंधी आहे. त्यामुळे दोघांनीही दोन रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या जोडप्याच्या लग्नाचं सेलिब्रेशन इथेच संपणार नाही, तर हे कपल मित्र आणि नातेवाईकांसाठी एका भव्य पार्टी आयोजन करणार आहे. रकुल प्रीत सिंग-जॅकी भगनानी यांच्या हळदी समारंभाचे काही सुंदर व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हळदी समारंभात या जोडप्याच्या आई-वडिलांचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला आहे. याशिवाय भूमी पेडणेकरने रकुल आणि जॅकी भगनानी यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. या जोडप्याच्या लग्नाबाबत सातत्यानं नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत.

Rakul Preet Jackky Bhagnani Wedding
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीचं लग्न

विवाहसोहळा दुपारी ३ वाजता : हे जोडपे वेगवेगळ्या रितीरिवाजांनी दोनदा लग्न करणार असून यासाठी दोघेही खूप उत्सुक आहेत. रकुल-जॅकी यांचा विवाहसोहळा दुपारी 3 वाजता सुरू होईल. याआधी या जोडप्यानं परदेशात लग्नाची योजना आखली होती, मात्र आता दोघांनीही गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या लग्नात शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राशिवाय आयुष्मान खुराना त्याची पत्नी ताहिरा कश्यप, अर्जुन कपूर, लव रंजन, डेव्हिड धवन यांच्यासह अनेक स्टार्स गोव्यात हजर आहेत.

हेही वाचा :

  1. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
  2. आमिन सयानींच्या निधनानंतर आवाजाची जादु अनुभवलेल्या रसिकांवर दुःखाची छाया
  3. महिला प्रीमियर लीग 2024 च्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करणार टायगर श्रॉफ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.