ETV Bharat / entertainment

हृदयविकाराच्या समस्येमुळे राखी सावंत रुग्णालयात दाखल, फोटो व्हायरल - Rakhi Sawant - RAKHI SAWANT

Rakhi Sawant : राखी सावंतला हृदयाच्या गंभीर समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता तिचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तिची तब्येत गंभीर असल्याचं दिसत आहे.

Rakhi Sawant
राखी सावंत (राखी सावंत फाइल फोटो(IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 10:17 AM IST

मुंबई -Rakhi Sawant : बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंत सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. ती लाइमलाइटमध्ये येण्यासाठी एक संधी देखील सोडत नाही. राखीची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राखी सावंतला हृदयविकाराचा गंभीर आजार असल्याचं सांगण्यात येत आहे. आता तिचा भयंकर अवस्थेतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसत आहे. याशिवाय एक नर्स तिच्या रक्तदाब तपासताना दिसत आहे. राखीला हृदयविकाराचा गंभीर त्रास असल्याचं डॉक्टरांचं म्हणणे आहे.

राखी सावंतची तब्येत गंभीर : राखी सावंतला याआधीही अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसापूर्वी तिचे पोटाशी संबंधित ऑपरेशन करण्यात आलं होतं. राखी सावंत बराच काळ दुबईत राहून मुंबईत परतली आहे. ती तिच्या कामामुळे बराच काळ दुबईत राहते. याशिवाय ती आपले व्हिडिओ टीक टॉकवर देखील बनवताना दिसते. राखी सावंत तिच्या वादग्रस्त विधानांनी सोशल मीडियावर नेहमीच खळबळ उडवत असते. काही दिवसांपूर्वी ती 'मोहल्ला' या गाण्यात दिसली होती तिचे गाणं हे चांगलच हिट झालं होतं. राखी अनेकदा तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेश कुमारबरोबर दिसतं.

राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानीचं प्रकरण : अलीकडेच तिचा आदिल दुर्रानीबरोबरचा घटस्फोटाचा मुद्दा खूप चर्चेत होता. ते प्रकरण अजून मिटलं नाही. राखीला आदिलनं घटस्फोट दिला नाही. तरीही त्यानं 'बिग बॉस 12' फेम सोमी खानबरोबर लग्न केलं आहे. अनेकदा राखी ही सोशल मीडियावर आदिल आणि तिच्या नात्याविषयी सांगताना दिसते. काही दिवसापूर्वी राखीनं दावा केला होता की, सोमीबरोबर लग्न केल्यानंतर आदिल हा तिला कॉल करून धमक्या देत असतो. सध्या आदिल आणि राखीचं प्रकरण खूप चर्चेत आहे. दरम्यान राखी शेवटी 'बिग बॉस मराठी'मध्ये दिसली होती. या शोमध्ये तिनं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं होतं.

हेही वाचा :

  1. संजय कपूरनं केला खुलासा, भाऊ बोनी कपूरनं कठीण काळात दिली नव्हती साथ... - sanjay kapoor
  2. 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमधील प्रतिष्ठित पुरस्कार 'पाल्मे डी ओर'ची झलक व्हायरल - PALME D OR AWARD
  3. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर 'मिस्टर अँड मिसेस माही'मधील पहिलं गाणं येतंय प्रेक्षकांच्या भेटीला - rajkummar rao and janhvi kapoor

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.