ETV Bharat / entertainment

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर राखी सावंत आली त्याच्या समर्थनार्थ पुढे, व्हिडिओ व्हायरल - Rakhi Sawant - RAKHI SAWANT

Salman khan and Rakhi sawant : राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या हल्लाबद्दल बोलताना दिसत आहे.

Salman khan and Rakhi sawant
सलमान खान आणि राखी सावंत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 10:49 AM IST

मुंबई - Salman khan and Rakhi sawant : बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या विचित्र वागण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. राखी तिच्या नाटकांमुळे प्रसिद्धझोतात येण्याचा अनेकदा प्रयत्न करत असते. आता पुन्हा एकदा राखीनं एक नवीन ड्रामा केला आहे. तिचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना दिसत आहे. दरम्यान सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार करण्यात आला होता. 2 हल्लेखोर दुचाकीवरून आले होते आणि हवेत गोळीबार करून फरार झाले. सोशल मीडियाच्या एका पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोईचा हात आहे.

राखी सावंतनं सलमान खानला दिलं समर्थन : आता या प्रकरणी अलीकडेच राखी सावंतनं भाईजानच्या समर्थनार्थ एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिनं म्हटलं की, "तो एक दिग्गज अभिनेता आहे. त्यानं अनेक गरीब लोकांची मदत केली आहे. गरीबांसाठी तो चित्रपटातून पैसे कमावतो. त्यानं गरीबांसाठी खूप काही केलं आहे. त्यानं माझ्या आईच्या ऑपरेशनच्या वेळी खूप मदत केली. त्याला बक्ष द्या प्लीज." राखी सलमान खानला तिचा मोठा भाऊ मानते. त्यामुळे सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर तिनं या व्हिडिओद्वारे आपली प्रतिक्रिया दिली. आता तिच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून तिला ट्रोल करत आहे.

राखी सावंत ट्रोल : या व्हिडिओवर एका युजरनं लिहिलं, "तुझ्या डोळ्यातून एक अश्रूही बाहेर आला नाही, तू खूप खालच्या दर्जाची व्यक्ती आहेस. आता तुझं खूप झालं, आधी तू कोणा एकाची हो, त्यानंतर तू बहीण बन.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, "सलमान भाईला तुझी गरज नाही तो खंबीर आहे. स्वतःला सांभाळ, तमाशा नको करू या गोष्टीचा." आणखी एकानं लिहिलं, "200 रुपये देऊन 50 रुपयाची ओव्हरअ‍ॅक्टींग केली." याशिवाय काही लोक या पोस्टमध्ये सलमानच्या समर्थनार्थ बोलताना दिसत आहे.

काय आहे प्रकरण : 1998 मध्ये, सलमान राजस्थानमध्ये 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाचे शूटिंग करत होता. यावेळी सलमाननं काळ्या काळविटाची शिकार केली होती. काळ्या काळवीटाला बिश्नोई समाज पवित्र मानतात. 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणात सलमानला तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती. लॉरेन्स बिश्नोईनं सलमानला मारण्याची शपक्ष घेतली आहे. त्यानं अनेकदा भाईजानला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. 'क्रू'च्या निर्मात्यांनी दिली प्रेक्षकांना बेस्ट ऑफर, आता पाहा 150 रुपयांमध्ये चित्रपट - crew zing offer
  2. भूषण मंजुळे स्टारर 'रीलस्टार'च्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग सुरू! - Bhushan Manjule
  3. हुमा कुरेशीनं 'गुलाबी' चित्रपटाच्या सेटवरून केले फोटो शेअर, पाहा पोस्ट - huma qureshi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.