ETV Bharat / entertainment

रजनीकांतच्या 'वेट्टियान'चे दिवाळीत रिलीजचे संकेत, अजितच्या चित्रपटाशी होऊ शकते बॉक्स ऑफिसवर टक्कर - Vettayaan hints at Diwali release - VETTAYAAN HINTS AT DIWALI RELEASE

Vettayaan hints at Diwali release : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन मोठे स्टार्स, रजनीकांत आणि अजित यांच्यात या दिवाळीत बॉक्स-ऑफिसवर टक्कर होण्याची शक्यता आहे. रजनीकांतचा 'वेट्टियान' हा चित्रपट महोत्सवादरम्यान प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे, तर अजितचा 'विदामुयार्ची' देखील दिवाळीत प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Vettayaan hints at Diwali release
रजनीकांत आणि अजित (Actors Rajinikanth and Ajith (ANI photo))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 4:32 PM IST

मुंबई - Vettayaan hints at Diwali release : दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगामध्ये या दिवाळीत बॉक्स-ऑफिसवर मोठा संघर्ष होण्याची चिन्हं आहेत. रजनीकांत आणि अजित या दोन सर्वात मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होण्याची शक्यता तयार झाली आहे. रजनीकांत आजवर बॉक्स ऑफिसवर नेहमी आपला झेंडा रोवत आल्याचं दिसलं आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचा आगामी 'वेट्टियान' चित्रपट रिलीज करण्यासाठी सज्ज आहे. सुरुवातीला, या चित्रपटाची सुर्याच्या 'कांगुवा' चित्रपटाशी टक्कर होण्याची अपेक्षा होती, परंतु निर्माता, केई ज्ञानवेल राजा यांनी हा संघर्ष होऊ नये यासाठी आधीच घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांचा चित्रपट 'वेट्टियान'शी स्पर्धा करणार नाही.

जरी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी यावरून असं सूचित होतं की, 'वेट्टय्यान' चित्रपट दिवाळी सणाच्या दरम्यान चित्रपटगृहात दाखल होईल. दरम्यान, अजितच्या 'विदामुयार्ची' चित्रपटाच्या निर्मात्यांनी याआधी दिवाळीत रिलीज होण्याचे संकेत दिले होते, ज्यामुळे दोन महान अभिनेत्यामध्ये संभाव्य संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. 2019 च्या पोंगल उत्सवादरम्यान शेवटच्या वेळी त्यांचा सामना झाला जेव्हा रजनीकांतच्या 'पेट्टा' आणि अजितच्या 'विश्वासम' या दोघांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. या वेळी, दावे जास्त आहेत, दोन्ही चित्रपट मोठ्या रिलीज प्रमाणावर रिलीजची प्रतीक्षा करत आहेत.

टी जे केई ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वेट्टियान' चित्रपटात रजनीकांत, अमिताभ बच्चन, फहद फासिल, राणा दग्गुबाती, मंजू वॉरियर, दुशरा विजयन, रितीका सिंग आणि राक्षण अशी प्रभावी स्टार कास्ट आहे. दुसरीकडे, विदामुयार्ची हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असल्याचं कळतं आहे. या चित्रपटात अभिनेता अजित आणि दिग्दर्शक मगिझ थिरुमेनी पहल्यांदाच एकत्र काम करत आहेत. दोन्ही चित्रपटांची लक्षणीय चर्चा होत असल्यामुळे या दिवाळीत दक्षिणेतील दोन सर्वात शक्तिशाली अभिनेते रजनीकांत आणि अजित यांच्यात बॉक्स ऑफिसवर एक रोमांचक लढत पाहायला मिळू शकते.

हेही वाचा -

  1. रजनीकांत स्टारर 'वेट्टयान'च्या ओपनिंग सॉन्गमध्ये अनिरुद्ध रविचंदरची डान्स क्लिप लीक - vettaiyan Movie
  2. रजनीकांत स्टारर 'वेट्टय्यान' चित्रपटाची नवीन पोस्टरसह झाली घोषणा - vettaiyan Movie
  3. 'कुली'साठी रजनीकांतनं घेतलं 300 कोटींचं मानधन, ठरला आशियातील सर्वात महागडा स्टार? - Rajinikanth

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.