मुंबई - Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत स्टारर आगामी 'वेट्टय्यान'च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत नवीन घोषणा केली आहे. लायका प्रॉडक्शननं रविवारी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले. ज्यामध्ये रजनीकांत जबरदस्त स्टाइलमध्ये दिसत आहेत. हा चित्रपट ऑक्टोबर 2024 मध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. रजनीकांतचे चाहते या चित्रपटाचीअनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. लायका प्रोडक्शननं या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करताना पोस्टवर लिहिलं, ''कुरी वेचाचू' 'वेट्टय्यान' या ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.''
रजनीकांतवर चाहत्यांचा प्रेमाचा वर्षाव : आता या पोस्टरवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिलं, ''थलैवाचा हा चित्रपट 'जेलर'प्रमाणे असणार आहे, मी नक्की चित्रपट पहिल्या दिवशी पाहणार आहे.'' दुसऱ्या एकानं या पोस्टवर लिहिलं, ''वेट्टैयान' हा रजनीकांतचा 170 वा चित्रपट आहे, जो या वर्षी ऑक्टोबरमध्ये जगभरात प्रदर्शित होईल.'' आणखी एकानं लिहिलं, ''रजनीकांत सरांचा मी खूप मोठा चाहता आहे, त्यांच्या या चित्रपटाची मी आतुरतेनं वाट पाहात आहे'', अशा अनेक कमेंट्स पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. रजनीकांतचा हा चित्रपट बऱ्याचं दिवसांपासून चर्चेत आहे.
'वेट्टैयान' चित्रपटाची स्टारकास्ट : 'वेट्टैयान' चित्रपटामध्ये प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे, ज्यात अमिताभ बच्चन, दुशारा विजयन, रितिका सिंग, फहाद फसिल, मंजू वॉरियर आणि राणा दग्गुबती यांच्या विशेष भूमिकांचा समावेश आहे. लायका प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाला अनिरुद्ध रविचंदर संगीत देत आहेत. रजनीकांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी त्याची मुलगी ऐश्वर्यानं दिग्दर्शित केलेल्या 'लाल सलाम' चित्रपटात दिसला होता. आता पुढं तो 'थलैवावर 171'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश कनगराज करणार आहे. सध्या या चित्रपटाबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. सन पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. 11 सप्टेंबर 2023 रोजी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.
हेही वाचा :