मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत थलाईवा रजनीकांत हे आज 12 डिसेंबर रोजी आपला 74वा वाढदिवस साजरा करत आहे. आज या विशेष प्रसंगी अनेक चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. वयाच्या 74व्या वर्षीही रजनीकांत चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय आहेत. आता देखील त्यांची चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरतात. दरम्यान रजनीकांत यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त साऊथ सुपरस्टार कमल हासन यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 'प्रिय मित्र, सुपरस्टार रजनीकांत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे आणखी हिट चित्रपट व्हावे, दीर्घायुष्य!'
रजनीकांत यांना दिल्या स्टार्सनं शुभेच्छा : तसेच साऊथ अभिनेता व्यंकटेश दग्गुबती यांनी शुभेच्छा देत लिहिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा रजनीकांत गारू, आशा आहे की तुमचे वर्ष आश्चर्यकारक जावो!' तसेच थलपती विजयनं रजनीकांत यांच्यासाठी एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यानं लिहिलं, 'प्रिय आणि आदरणीय सुपरस्टार श्री. रजनीकांत त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.' याशिवाय कार्तिक सुब्बाराज यांनी त्याच्या पोस्टमध्ये शुभेच्छा देताना लिहिलं, 'थलाईवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.' बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफनं रजनीकांत यांच्यासाठी शेअर केलेल्या आपल्या पोस्टवर लिहिलं, ' नेहमीच आनंदी रजनीकांत.' याशिवाय यावर त्यांनी एक हार्ट देखील शेअर केलं आहे. तसेच संगीतकार अनिरुद्ध रविचंदरनं देखील एक पोस्ट शेअर करत रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवरील पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'थलाईवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुझ्यावर खूप प्रेम आहे.' याशिवाय त्यानं पोस्टवर हार्ट आणि नमस्कार जोडला आहे. तसेच लायका प्रॉडक्शन हाऊननं त्याच्या पेजवर पोस्ट शेअर करून रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Happiness Always ❤️ @rajinikanth pic.twitter.com/HgfDIh5dvG
— Jackie Shroff (@bindasbhidu) December 12, 2023
Happy birthday dear @rajinikanth garu! Sending my warmest wishes, hope you have an amazing year! pic.twitter.com/Zjg6mfSND5
— Venkatesh Daggubati (@VenkyMama) December 12, 2024
Happy Birthday Thalaivaaaa ❤️❤️❤️#HBDSuperstarRajinikanth pic.twitter.com/tmaR9kvZG3
— karthik subbaraj (@karthiksubbaraj) December 12, 2024
Happy Birthday Thalaiva 🙏🏻🙏🏻🙏🏻
— Anirudh Ravichander (@anirudhofficial) December 11, 2024
Love you to the stars and beyond ❤️❤️❤️#HappyBirthdaySuperstarRajinikanth #HBDSuperstarRajinikanth https://t.co/Zq4iIfN0D6
Happy Birthday to our Thalaivar @rajinikanth 🌟 A legend whose journey inspires countless hearts and a legacy that echoes through generations. Wishing you good health, happiness, and a blockbuster year ahead! 🕶️🎉#HBDRajinikanth #Rajinikanth pic.twitter.com/KCtP4DM8X2
— Lyca Productions (@LycaProductions) December 12, 2024
रजनीकांतचं वैयक्तिक आयुष्य : रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी एका मराठी कुटुंबात झाला. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांचे नाव शिवाजीराव गायकवाड होते. 1975 मध्ये रिलीज झालेल्या 'अपूर्वा रागंगल' या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी रजनीकांत बस कंडक्टर होते. रजनीकांत यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये 'जेलर', '2.0', 'काला', 'शिवाजी द बॉस ' , 'चंद्रमुखी' 'रोबोट' आणि अनेक चित्रपटांचा समावेश आहे. शेवटी रजनीकांत 'वेट्टायन ' या चित्रपटामध्ये दिसले होते. आता पुढं ते 'कुली' चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचा :