ETV Bharat / entertainment

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी रजनीकांत दिल्लीला रवाना - Narendra Modi Oath Ceremony - NARENDRA MODI OATH CEREMONY

Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदींच्या शपथविधीला साऊथ सुपरस्टार रजनीकांत हजेरी लावणार आहे. रजनीकांत चेन्नई विमातळावर दिसले.

Narendra Modi Oath Ceremony
नरेंद्र मोदींचा शपथ विधी (रजनीकांत (फाइल फोटो) (ANI Photo))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 3:59 PM IST

चेन्नई - Narendra Modi Oath Ceremony : साऊथ सुपरस्टार रजनीकांत रविवारी 9 जून रोजी सकाळी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी चेन्नई विमानतळावर रवाना झाले आहे. विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना रजनीकांतनं मोदींच्या सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. रजनीकांतनं कौतुक करत म्हटलं, "नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ही मोठी उपलब्धी आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. या लोकसभा निवडणुकीत जनतेने प्रबळ विरोधी पक्षालाही निवडून दिलंय. त्यामुळे चांगली लोकशाही प्रस्थापित होईल. मला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी समारंभाचे निमंत्रण मिळाले आहे."

रजनीकांत चेन्नई विमातळावर स्पॉट : याशिवाय रजनीकांतनं नाम तमिलर काची (एनटीके) सह-संयोजक सेन्थामिझन सीमन यांचेही प्रचंड बहुमतानं निवडणूक जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं. आज, 9 जून, संध्याकाळी 7:15 वाजता, मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदासाठी निवडून आलेले ते एकमेव नेते आहेत. नरेंद्र मोदींबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यही शपथ घेणार आहेत. सायंकाळच्या कार्यक्रमापूर्वी दिल्लीत उमेदवाराचा फोटो असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

वर्कफ्रंट : या कार्यक्रमासाठी दिल्ली पोलिसांचे, सुमारे 1100 वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. भारताच्या 'नेबरहुड फर्स्ट' धोरणाची साक्ष देणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या शपथविधी समारंभासाठी शेजारील देश आणि परदेशातील अनेक नेते आणि राष्ट्रप्रमुखांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. हा शपथ विधी पाहण्यासाठी चित्रपटसृष्टीतून अनेक नामवंत व्यक्ती जाणार आहेत. दरम्यान रजनीकांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते 'वेट्टयान' चित्रपटात अमिताभ बच्चनबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसेल. याशिवाय या चित्रपटात राणा दग्गुबती, फहद फासिल, रितिका सिंग, दुशारा विजयन आणि इतर कलाकर दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाबद्दल खूप चर्चा सुरू आहेत. तसेच रजनीकांत हा 'कुलीज' आणि 'जेलर 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. साऊथ अभिनेता नितीन स्टारर 'रॉबिनहूड'च्या टीमनं सेटवर रामोजी राव यांना वाहिली आदरांजली... - RAMOJI RAO PASSES AWAY
  2. कंगना रनौतच्या झापडच्या घटनेवर हृतिक रोशनचं काय आहे मत? - hrithik roshan
  3. फिल्मी दुनियेत रामोजी रावांचाच दबदबा; 'ईटीव्ही मराठी'च्या माध्यमातून दिल्या सुपरहिट मालिका - Ramoji Rao passed away

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.