मुंबई - Rajinikanth first look photo : रजनीकांतनं त्यांच्या चाहत्यांना आज 27 जून रोजी एक मोठी भेट दिली आहे. रजनीकांतनं जेलर (2023) मधून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं होत. आता तो त्याच्या आगामी दोन चित्रपट 'वेट्टय्यान' आणि 'कुली'मुळे चर्चेत आहे. आज 'कुली'चे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. लोकेश यांनी एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कुली स्टार रजनीकांतच्या लूक टेस्टचा फोटो शेअर केला आहे. याशिवाय या चित्रपटाचं शूटिंग जुलैपासून सुरू होणार असल्याचं सांगितलं आहे.
Look test for #Coolie 🔥
— Lokesh Kanagaraj (@Dir_Lokesh) June 26, 2024
On floors from July pic.twitter.com/ENcvEx2BDj
'कुली'मधील रजनीकांतचं लूक : 'कुली' चित्रपटात रजनीकांत स्टायलिश लूकमध्ये दिसणार आहेत. शेअर केलेल्या फोटोत रजनीकांत आरशासमोर बसले आहेत आणि कुली चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश त्याच्या मागे उभे आहेत. त्यांनी हा फोटो क्लिक केला असून यात रजनीकांतनं काळा शर्ट, काळा चष्मा घातलेला दिसत आहे. त्याच त्याची स्मोकी हेअरस्टाईलमध्ये तो खुप सुंदर दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत लोकेश कनागराजनं लिहिलं, "कुली'ची लूक टेस्ट, जुलैपासून चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे. त्याचबरोबर या पोस्टवर रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून कमेंट्सचा पूर आला आहे. हा फोटो रजनीकांतच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
रजनीकांतचं केलं चाहत्यांनी कौतुक : या फोटोवर एका चाहत्यानं लिहिलं, "1000 कोटी लोडिंग" आणखी एकानं लिहिलं, "कुली" हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई करेल." दुसऱ्या एकानं लिहिलं, "रजनीकांत सरांचा हा लूक खूप विशेष आहे." या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून रजनीकांतवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. याशिवाय काहीजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. रजनीकांतच्या 'जेलर' हिटनंतर आता अनेकांना 'कुली' चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. 'जेलर' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 650 कोटीची कमाई केली होती. हा चित्रपट 200 कोटीच्या बजेटमध्ये बनला होता. या चित्रपटामध्ये रजनीकांतनं जेलरची भूमिका साकारली होती.
हेही वाचा :