ETV Bharat / entertainment

रजनीकांतला 3 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज, शूटिंगसाठी सज्ज - Rajinikanth discharged - RAJINIKANTH DISCHARGED

Rajinikanth discharged : साऊथचा मेगास्टार रजनीकांतला रुग्णालयातून घरी जाण्यास परवानगी मिळाली आहे. त्याच्या हृदयाच्या वाहिनीला सूज आली होती.

Rajinikanth
रजनीकांत (रजनीकांत (फाइल फोटो) (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2024, 1:53 PM IST

चेन्नई - साऊथचा मेगास्टार रजनीकांतच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. रजनीकांत यांना गुरुवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नुकतेच रजनीकांतला प्रकृती अस्वास्थ्यामुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

चेन्नई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांना ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 ऑक्टोबर रोजी अपोलो हॉस्पिटलने एक मेडिकल बुलेटिन जारी केलं होतं. यानुसार, रजनीकांत यांच्या हृदयाच्या मुख्य वाहिनीमध्ये जळजळ झाली होती. यावर विना शस्त्रक्रिया ट्रान्सकॅथेटर पद्धतीनं उपचार करण्यात आले.

रुग्णालयाचे वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट साई सतीश यांनी त्यांच्या महाधमनीमध्ये एक स्टेंट ठेवला, ज्यामुळे त्यांना सूजपासून आराम मिळाला. हेल्थ अपडेटमध्ये असं लिहिलं आहे की, "आम्ही त्याच्या हितचिंतकांना आणि चाहत्यांना कळवू इच्छितो की प्रक्रिया योजनेनुसार सफल झाली आहे. रजनीकांत यांची प्रकृती स्थिर आणि ठीक आहे."

रजनीकांत यांना बरं वाटावं आणि ते सुखरुप असावेत यासाठी त्यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत हिनं चेन्नईतील तिरुवोट्टीयुर श्री वादिवुदाई अम्मान मंदिरात प्रार्थना केली होती. पूजा आणि प्रार्थना करत असतानाचा मंदिरातील सौंदर्याचा व्हिडिओही समोर आला होता. व्हिडिओमध्ये ती आपल्या वडिलांच्या उत्तम आरोग्यासाठी श्री वादिवुदाई अम्मनकडे प्रार्थना करताना दिसत आहे.

रजनीकांतचे आगामी चित्रपट

रजनीकंत लवकरच त्याच्या आगामी 'कुली' चित्रपटाचं शूटिंग सुरू करू शकतात. याशिवाय रजनीकांत टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित 'वेट्टियांन' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. अलीकडेच निर्मात्यांनी वेट्टियांनचा ट्रेलर रिलीज केला होता. याला चाहत्यांचा आणि प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात रजनीकांतसह अमिताभ बच्चन, राणा दग्गुबती, फहद फासिल, मंजू वॉरियर, रितिका सिंग, रोहिणी, दुशरा विजयन, राव रमेश आणि रमेश थिलक सहकलाकार म्हणून दिसणार आहेत.

हेही वाचा -

  1. Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत मुंबई विमानतळावर स्पॉट; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव...
  2. अभिनेता रजनीकांत रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थीर असल्याची कुटुंबीयांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.