मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील महान दिग्गज अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता राज कपूर यांची 14 डिसेंबर रोजी 100वी जयंती आहे. या विशेष दिवशी कपूर कुटुंब काही भव्य करणार आहे. अलीकडेच रणबीर कपूर - आलिया भट्ट, करीना कपूर-सैफ अली खान, नीतू कपूर-करिश्मा कपूर दिल्लीला जाताना दिसले होते. या विशेष कार्यक्रमासाठी कपूर कुटुंबानं पंतप्रधान मोदींना आमंत्रित केलंय. आता त्यांचे दिल्ली काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये आलिया नेहमीप्रमाणे साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. याशिवाय रणबीरनं काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. यामध्ये तो खूप देखणा दिसत आहे.
राज कपूर यांची 100वी जयंती : याशिवाय नीतू आणि करिश्मानं पांढऱ्या रंगाचा पारंपारिक पोशाख परिधान केला आहे. दुसरीकडे करीनानं लाल रंगाच्या सूट घातला असून यात ती खूप सुंदर दिसत आहे, तर सैफनं यावेळी पांढऱ्या रंगाचा कोट सूट घातला आहे. कपूर कुटुंबीय दिग्गज राज कपूर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये चित्रपटसृष्टीतील स्टार्सला आमंत्रित करण्यात येणार आहे. दरम्यान या सेलिब्रेशनमध्ये पंतप्रधान मोदींनाही आमंत्रित करण्यात आलंय. 13-15 डिसेंबर रोजी हा सोहळा होणार आहे. काही दिवसांपूर्वी करीना कपूरनं एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिनं लिहिलं होत, 'त्यांचा वासरा कायम आहे, माझे आजोबा लीजेंडरी शोमॅन, राज कपूर यांची 100वी जयंती साजरी करताना मला खूप अभिमान वाटत आहे. 13-15 डिसेंबर, 2024 या कालावधीत 40 शहरे आणि 135 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या त्यांच्या उत्कृष्ट चित्रपटांच्या प्रवासासाठी आमच्यासोबत सामील व्हा.'
भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला 'शोमॅन' : राज कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीचे पहिले शोमॅन होते. त्यांनी ' मेरा नाम जोकर', 'हिना', 'सपनों का सौदागर', 'बॉबी', 'संगम,' यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांनी लोकांची मने जिंकली. राज कपूर यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा चार्ली चॅप्लिन देखील म्हटले जाते, कारण ते स्वत: चार्ली चॅप्लिनपासून प्रेरित होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्यासारख्या भूमिका केल्या आहेत. 'आवारा' चित्रपटामधील त्याच्या अभिनयाला, जागतिक चित्रपटातील सर्वकालीन टॉप टेन ग्रेटेस्ट परफॉर्मन्समध्ये स्थान देण्यात आले. भारत सरकारनं 1971 मध्ये त्यांना पद्मभूषण देऊन गौरविले. तसेच 1988 मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील भारतातील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना अनेकदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 रोजी झाला. 2 जून 1988 रोजी वयाच्या 63व्या वर्षी त्यांचे निधन झाले.