मुंबई : 'कुबूल है' फेम अभिनेत्री सुरभी ज्योती तिचा बॉयफ्रेंड सुमित सूरीबरोबर लग्न करणार आहे. शनिवारी, 27 ऑक्टोबर रोजी तिनं सोशल मीडियावर हळदी समारंभामधील काही फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सुरभी ज्योतीचे यापूर्वी मेहंदीच्या सोहळ्यामधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो चाहत्यांना पसंत पडले होते. अनेकांनी तिच्या लूकचे देखील कौतुक केलं होतं. या फोटोमध्ये सुरभी तिच्या होणाऱ्या पतीबरोबर ढोलावर नाचत होती . दरम्यान हळदीच्या समारंभामधील फोटोत सुरभी खूप आकर्षक दिसत आहे. आता या फोटोंवर देखील चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.
सुरभी आणि सुमितचे केले चाहत्यांनी कौतुक : सुरभी ज्योतीनं या समारंभात पिवळ्या रंगाचा एथनिक पोशाख परिधान केला आहे. यावर तिनं पांढऱ्या रंगाची ओढणी घेतली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं 'यलो लव्ह अफेअर' असं लिहिलंय. दरम्यान चाहत्यांनी कौतुक करत या पोस्टवर लिहिलं, 'तू खूप सुंदर दिसत आहेस.' दुसऱ्यानं एकानं लिहिलं, ' तुम्ही दोघेही खूप सुंदर एकत्र दिसत आहात, फोटो छान आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट लग्न असेल, वधू-वरालाचे खूप खूप शुभेच्छा.' याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.
सुरभी ज्योतीचे मेहंदी सोहळ्यामधील लूक : दरम्यान मेहेदी समारंभासाठी सुरभीनं हिरवा सलवार सूट परिधान केला होता. यावर तिनं नेटचा दुपट्टा घेता होता. लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं सुंदर कानातले आणि मांग टिक्का घातला होता. सुमित सूरीनेही या खास दिवशी हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. सुरभी आज 27 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट येथील अहाना लक्झरी रिसॉर्टमध्ये विवाह करणार आहे. यापूर्वी तिनं या वर्षीच्या मार्चमध्ये लग्न करण्याचा विचार केला होता, मात्र तिच्या पसंतीचे ठिकाण न मिळाल्यानं तिला तिचा विवाह पुढं ढकलावा लागला. दरम्यान सुरभी ज्योतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुढं तिनं बऱ्याच टीव्ही मालिकेत काम केलंय. सुरभीची 'कुबूल है' आणि 'नागिन' या दोन्ही मालिका खूप गाजल्या होत्या. या दोन्ही मालिकेमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली.