ETV Bharat / entertainment

महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटनाआधी शाहिद कपूरने शेअर केला डान्स रिहर्सलचा व्हिडिओ - महिला प्रीमियर लीग

Shahid Drops Rehearsal Video : स्टार अभिनेता शाहिद कपूरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर त्याच्या डान्स रिहर्सल सेशनमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. आगामी महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यात तो डान्स परफॉर्मन्स करणार आहे.

Shahid Drops Rehearsal Video
शाहिद कपूरने शेअर केला डान्स रिहर्सलचा व्हिडिओ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 3:03 PM IST

मुंबई - Shahid Drops Rehearsal Video : 23 फेब्रुवारी 2024 रोजी महिला प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा अतिशय नेत्रदीपक पद्धतीने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात शाहरुख खान आणि शाहिद कपूर यांसारख्या सुप्रसिद्ध सुपरस्टार्सच्या जबरदस्त परफॉर्मन्सचा समावेश असेल. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा, कार्तिक आर्यन आणि टायगर श्रॉफ हे देखील 23 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहेत.

शाहीद कपूरने डब्ल्यूपीएलच्या उद्घाटन समारंभासाठी देणार असलेल्या परफॉर्म्नसच्या सराव सत्रातील एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने लिहिले आहे, "वुमन्स प्रीमियर लीगचा तो क्षण जवळ आला आहे. उद्घाटन समारंभासाठी बंगळुरूमध्ये परफॉर्म करत असल्याचा मला अभिमान आहे." यावेळी शाहिद कपूर पिवळ्या रंगाच्या को-ऑर्डर हुडी आणि ट्राउझर्समध्ये दिसला.

उद्घाटन समारंभासाठी रिहर्सल करत असलेल्या कलाकारांचे पडद्यामागील फुटेज देखील वुमन्स प्रीमियर लीगच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहे. वुमन्स प्रीमियर लीगच्या हंगामाला सुरूवात होण्यापूर्वी शाहिदने त्याचे क्रिकेटवरील प्रेम मान्य केले आणि महिला क्रिकेट आणि त्याचे भविष्य सुधारण्यासाठी लीगच्या महत्त्वावर जोर दिला. व्हिडिओमध्ये, शाहिदने सांगितले की, "मी क्रिकेटचा खूप मोठा चाहता आहे. मी क्रिकेटचा एक खेळ म्हणून आनंद घेतो. मी लहानपणी क्रिकेटर बनण्याची आकांक्षा बाळगली होती. जेव्हाही मी स्टेडियममध्ये प्रवेश करतो तेव्हा मी उत्साहाने भरून जातो."

महिला प्रीमियर लीग (WPL) च्या अत्यंत अपेक्षित दुसऱ्या सत्राला आज (शुक्रवार) सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स (MI) आणि गतवर्षीच्या उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. हे सर्व सामने 17 मार्चपर्यंत बेंगळुरू आणि दिल्ली येथे होणार आहेत. 17 मार्चला नवी दिल्ली येथे ग्रँड फिनाले होईल आणि 15 मार्च रोजी एलिमिनेटरचे सामने पार पडतील. दिल्ली आणि बेंगळुरूचे आयोजक दोन्ही ठिकाणी होणाऱ्या सामन्यांचे आयोजन करतील.

हेही वाचा -

  1. जॅकी भगनानीसह लग्नात रकुल प्रीत सिंगची ब्राइडल एन्ट्री झाली व्हायरल
  2. सलमान खानच्या चेहरा रंगवलेल्या पँटसह फन्की एअरपोर्ट लूकने पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले
  3. 'आर्टिकल 370' बॉक्स ऑफिस ओपनिंग: यामी गौतम आणि प्रियामणीच्या चित्रपटाची उत्तम सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.