ETV Bharat / entertainment

मराठी चित्रपटसृष्टीकडे आकृष्ट झालेले इतर भाषिक कलाकार...! - MARATHI FILM INDUSTRY

मराठी चित्रपटाचं बलस्थान त्याच्या कथानकात असतं. आशयपूर्ण चित्रपटांची ओळख असलेल्या या इंडस्ट्रीकडे अमराठी निर्मातेही आकृष्ट झाले आहेत. त्यामध्ये काही नामवंत कलाकारही आहेत.

Producers from other languages
मराठी चित्रपटसृष्टीकडे आकृष्ट झालेले कलाकार (Etv Bharat/Instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 30, 2024, 12:56 PM IST

मुंबई - दादासाहेब फाळके हे भारताच्या चित्रपटसृष्टीचे जनक आहेत आणि भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र त्यांनी बनविला होता. त्यानंतर अनेकजण चित्रपट निर्मितीत उतरले आणि म्हणता म्हणता महाराष्ट्रात जन्मलेली चित्रपटसृष्टी इतरभाषिकांच्या ताब्यात गेली. तरीही मराठी चित्रपट बनविणारी अनेक मंडळी होती. आजही मराठी चित्रपटसृष्टी तग धरून आहे. मराठी चित्रपटांना देशविदेशात मानसन्मान मिळत आला असून आशयघनतेत तो अव्वल मानला जातो. मराठीमध्ये सतत काहीनाकाही प्रयोग होत असतात आणि विविधांगी विषय हाताळले जातात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हल्लीच मिळालेला असला तरी मराठी भाषा त्यातील साहित्यामुळे प्रगल्भ आहे. मराठी साहित्यातील अनेक संहिता सिनेमारूपात मोठ्या पडद्यावर अवतरताना दिसतात. हिंदी सिनेमा जास्त लोकप्रिय असला तरी तो 'फॉर्म्युला' मध्ये अडकलेला आहे. तिथे प्रयोग करण्याची संधी नसल्यातच जमा असल्यामुळे तेथील अनेक लोक मराठीत येऊ लागले.

मिस वर्ल्ड प्रियांका चोप्रा ने हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमविल्यावर, आपली आई डॉ मधू चोप्रा सोबत, पर्पल पेबल्स पिक्चर्स नावाची नियमितिसंस्था स्थापन केली. 'पीपीपी' ने २०१६ साली मराठी चित्रपट 'व्हेंटिलेटर ' ची निर्मिती केली ज्याचे दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केलेले होते. या चित्रपटाला ३ राष्टीय पुरस्कार मिळाले. त्यानंतरचा त्यांची निर्मिती असलेला दुसरा मराठी चित्रपट म्हणजे 'काय रे रास्कला'. त्याला फारसे यश मिळाले नाही. सुप्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे ने 'पाणी' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलॆ आणि तो चित्रपट प्रियांका चोप्रा प्रेझेंट करीत आहे. 'पाणी' चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड प्रदान करण्यात आला असून तो लवकरच प्रदर्शित होत आहे.

रितेश देशमुख हा मराठमोळा कलाकार हिंदीत जास्त रमला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा रितेश हा सुपुत्र. त्यानेही आपली अभिनेत्री बायको जिनिलिया देशमुख सोबत मुंबई फिल्म कंपनी नावाची निर्मितीसंस्था सुरु केली. त्यांची पहिली निर्मिती होती 'बालक पालक'. हा चित्रपट रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलॆला होता आणि सेक्स एज्युकेशन या विषयावर आधारित होता. त्यानंतर त्याने 'फास्टर फेणे' ची निर्मिती केली. मुंबई फिल्म कंपनी ने
'लय भारी' आणि 'माउली' हे चित्रपटही केले ज्यात रितेश देशमुख प्रमुख भूमिकांत होता. त्यानंतरच्या 'वेड' या चित्रपटाद्वारे रितेश ने दिग्दर्शनीय पदार्पण देखील केले.

अक्षय कुमार हा त्याच्या मसाला चित्रपटांसाठी ओळखला जायचा आणि तो आता आशयपूर्ण चित्रपटांतूनही दिसून येतो. त्याने आपली अभिनेत्री बायको ट्वीनकल खन्ना, जी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरसरार राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांची कन्या आहे, हिच्यासोबत केप ऑफ गुड फिल्म्स या निर्मितीसंस्थेची स्थापना केली. '७२ मैल एक प्रवास' या मराठी चित्रपटाची निर्मिती अक्षय ची होती. त्यानंतर त्याने निर्मिती केलेल्या 'चुम्बक' साठी गीतकार स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमार तो अभिनय करीत असलेल्या चित्रपटांचा सहनिर्माता देखील असतो. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या मराठी चित्रपटात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

अजय देवगण ऍक्शन चित्रपटांसाठी ओळखला जात असला तरी त्याच्या अनेक संवेदनशील भूमिका प्रेक्षकांना भावल्यात. अजय ने स्थापन केलेल्या देवगण फिल्म्स या निर्मितीसंस्थेमार्फत 'विटी दांडू' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. श्रीयुत गंगाधर टिपरे या लोकप्रिय मराठी मालिकेतील शिऱ्या हे पात्र साकारणारा अभिनेता विकास कदम याने अजयला मराठी चित्रपटनिर्मितीसाठी मदत केली होती. त्यानंतर अजय देवगण ने सतीश राजवाडे दिग्दर्शित आणि नाना पाटेकर व सुमीत राघवन अभिनित 'आपला मानूस'ची निर्मिती केलेली होती.

याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांनी 'विहीर'च्या निर्मितीत भाग घेतला होता. अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन या त्यांच्या निर्मितीसंस्थेचा हा पहिला मराठी चित्रपट. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट बर्लिन फिल्म फेस्टिव्हल आणि रॉटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, नेदरलँड्समध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये उत्तुंग यश मिळविले परंतु जेव्हा निर्मितीचा विचार आला तेव्हा तिने मराठी चित्रपटांकडे मोर्चा वळविला. 'बकेट लिस्ट' या चित्रपटातून तिने मराठीत अभिनय पदार्पण केले आणि नंतर तिने आपले पती डॉ श्रीराम नेने यांच्यासोबत आर एन एम मुव्हिंग पिक्चर्स या संस्थेची स्थापना केलॆली आणि 'पंचक' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. मराठमोळी उर्मिला मातोंडकर हिंदीत मोठी स्टार होती आणि तिने 'माधुरी' नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. तसेच जुन्या काळातील हिरॉइन्स वैजयंतीमाला आणि विद्या सिन्हा यांनी अनुक्रमे 'झेप' आणि 'बिजली' या मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.