ETV Bharat / entertainment

Nick Jonas : देसी गर्लचा लूक पाहून पती निक जोनासनं केलं कौतुक - Nick Jonas

Nick Jonas : ईशा अंबानीच्या होळी पार्टीत प्रियांका चोप्राची जबरदस्त स्टाइल पाहायला मिळाली. देसी गर्लचा लूक पाहून पती निक जोनास तिचे कौतुक केलं आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 7:39 PM IST

मुंबई - Nick Jonas : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असते आणि अनेकदा ती तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. चाहत्यांबरोबर चित्रपटसृष्टीतील सर्व स्टार्स प्रियांकाच्या पोस्टवर सुंदर कमेंट करताना दिसतात. दरम्यान, प्रियांका चोप्रानं अलीकडेच ईशा अंबानीच्या होळी पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीमधील तिनं ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. प्रियांकाच्या फोटोवर पती निक जोनासनं प्रतिक्रिया सुंदर अशी प्रतिक्रिया दिली आहे. देसी गर्लचा लूक पाहून निकनं हा खूप प्रभावित झाला आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा

ईशा अंबानीची होळी पार्टी : निक जोनासनं प्रियांकाच्या जबरदस्त लुकवर प्रतिक्रिया देत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'तू माझी मस्करी करत आहेस का?' प्रियांकाच्या लुकचे कौतुक करण्यापासून निक स्वतःला रोखू शकला नाही. प्रियांकाच्या शेअर केलेल्या क्लोज-अप फोटोबरोबर तिनं एक इमोजीही पोस्ट केला आहे. प्रियांका चोप्रानं अलीकडेच ईशा अंबानीनं आयोजित केलेल्या रोमन होली पार्टीमध्ये आपल्या सौंदर्याची जादू पसरवली आहे. पिंक साडीत प्रियांकाचा ग्लॅमरस लूक पाहण्यासारखा आहे. प्रियांका नुकतीच पती निक जोनास आणि लाडकी मुलगी मेरी चोप्रा जोनासबरोबर भारतात आली होती.

प्रियांकानं आपल्या मुलीसह पापाराझीला दिली पोझ : प्रियांका आणि तिची मुलगी मालती मेरी मुंबई विमानतळावर स्पॉट झाल्या होत्या. यावेळी प्रियांकानं आपल्या मुलीसह पापाराझीला फोटोसाठी पोझ दिली होती. यावेळेचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान ईशा अंबानीनं आयोजिक केलेल्या पार्टीत राधिका मर्चंट आणि श्लोका मेहता अभिनेत्री माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी आणि आयुष्मान खुराना हे प्रसिद्ध लोक दिसले होते. याआधी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यात अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात मात्र प्रियांका चोप्रा दिसली नव्हती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळा हा खूप भव्य होता. या सोहळ्यात जगभरातील अनेक नामवंत व्यक्ती आले होते.

हेही वाचा :

  1. Elvish Yadav Arrested : रेव्ह पार्टी प्रकरणात एल्विश यादवला अटक
  2. Ed Sheeran : ग्लोबल सिंगर एड शिरीन कॉन्सर्टनंतर मुंबई विमानतळावर झाला स्पॉट ; व्हिडिओ व्हायरल
  3. पुलकित सम्राटच्या दिल्लीतील घरी क्रिती खरबंदाचा भव्य गृह प्रवेश, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.