ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रानं पतीला वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा, निक जोनासनं लंडन लाइव्ह कॉन्सर्टमध्ये कापला केक - NICK JONAS BIRTHDAY

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 12:28 PM IST

Nick Jonas Birthday : प्रियांका चोप्रानं तिचा पती निक जोनासच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यात ती निकच्या कॉन्सर्टमध्ये उपस्थित असल्याची दिसत आहे. निकच्या वाढदिवनिमित्त तिनं पतीला शुभेच्छा दिल्या आहेत.

Nick Jonas Birthday
निक जोनासचा वाढदिवस ((IMAGE- ANI))

मुंबई -Nick Jonas Birthday : हॉलिवूड गायक निक जोनासनं 16 सप्टेंबर रोजी 32 वा वाढदिवस साजरा केला. या विशेष प्रसंगी पत्नी प्रियांका चोप्रानं त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी निकनं लंडनमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट केला. यामध्ये प्रियांका तिची मुलगी मालतीबरोबर सहभागी झाली होती. 17 सप्टेंबरच्या पहाटे, प्रियांकानं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर बर्थडे बॉय निक जोनासच्या O2 एरिना लंदन कॉन्सर्टमधील काही फोटो शेअर केले. निकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू आमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवतोस. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, निक जोनास.'

प्रियांका चोप्रानं दिल्या निकला वाढदिवसाच्या शुभेच्छा : प्रियांकानं शेअर केलेल्या पहिल्या फोटोत निकनं तिला मिठीत घेतलेलं आहे. याशिवाय प्रियांका ही आपल्या लाडक्या मुलीला स्पर्श करताना दिसत आहे. तसेच निकदेखील आपल्या मुलीकडे प्रेमानं पाहात आहे. यानंतर एक क्लिप समोर आली आहे, यात निक स्टेजवर लाईव्ह परफॉर्म करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, चाहते त्यांच्या मोबाईल फोनचे फ्लॅश लावून कॉन्सर्टमध्ये जल्लोष करताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत प्रियांका ही मुलगी मालतीला कडेवर घेऊन हॉलवेमधून चालताना दिसत आहे. मालतीनं यावेळी तिच्या कानात हेडफोन घातला आहे. तसेच शेवटच्या फोटोत निक आपल्या मुलीला कडेवर घेऊन जाताना दिसत आहे.

निक जोनासचा लाइव्ह कॉन्सर्ट : लंडन लाइव्ह कॉन्सर्टमधून निक जोनासचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये, निक हा लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. याशिवाय चाहते त्यावेळी त्याच्यासाठी वाढदिवसानिमित्त गाणं गात आहेत. निक जोनास आणि जोनास ब्रदर्स वर्ल्ड टूरवर आहेत. सोमवारी त्यांनी लंडनमध्ये एका कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं. जोनास ब्रदर्स मंगळवारी याठिकाणी कार्यक्रम सादर करणार आहे. आता निक जोनासला लाइव्ह कॉन्सर्टमध्ये जाण्यासाठी अनेक चाहते खूप उत्सुक असल्याचं दिसत आहेत. अनेकजण प्रियांकानं शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट्स करून निकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. प्रियांका चोप्रा पती निक जोनासबरोबर सुट्टीत झाली रोमँटिक, बिकिनीवरचे फोटो व्हायरल - PRIYANKA CHOPRA share pics
  2. निक जोनास-देसी गर्लची जोडी पुन्हा चर्चेत, मित्राच्या लग्नात दिसला रोमॅंटिक अंदाज - Nick Jonas shares a romantic photo
  3. प्रियांका चोप्रानं कुटुंबासह 'द ब्लफ'च्या क्रूबरोबर मजेशीर झलक केली शेअर - priyanka share pics and videos

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.