ETV Bharat / entertainment

'लाहोर 1947' चित्रपटाद्वारे प्रीती झिंटा करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन, फोटो व्हायरल - preity zinta - PREITY ZINTA

Preity Zinta in Lahore 1947: प्रीती झिंटा हिंदी चित्रपटसृष्टीत 'लाहोर 1947' चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे. तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Preity Zinta
प्रीती झिंटा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 10:13 AM IST

मुंबई - Preity Zinta in Lahore 1947: बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर असलेली प्रीती झिंटा लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे. ती बहुप्रतीक्षित सनी देओल स्टारर 'लाहोर 1947' या चित्रपटामध्ये विशेष भूमिकेत दिसणार आहे. खुद्द प्रीतीनं याबद्दलची पुष्टी केली आहे. 23 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या निमित्तानं तिनं तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. 'लाहोर 1947' या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो तिनं शेअर केले. चित्रपटाच्या क्लॅपर बोर्डचा फोटो पोस्ट करत तिनं लिहिलं, 'लाहोर 1947 च्या सेटवर...' याशिवाय तिनं दिग्दर्शक राजकुमार संतोषीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

प्रीती झिंटा करणार पुनरागमन : प्रीती झिंटा आणि सनी देओल एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वी 'हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय', 'फर्ज' आणि 'भैय्याजी सुपरहिट' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर प्रीतीच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, "प्रीती परत आली, याबद्दल आता मला आनंद होत आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "क्वीन इज बॅक इन बॉलिवूड" आणखी एकानं लिहिलं, "गदर 2 चित्रपटासारखा 'लाहोर 1947' हा देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार आहे." याशिवाय काहीजणांनी या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.

प्रीती झिंटाचं वर्कफ्रंट : 'लाहोर 1947'ची घोषणा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाली होती. सनी आणि आमिरच्या प्रॉडक्शनमधील हा पहिलाच सहयोगी चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या हवेलीत सुरू आहे. प्रीतीनं 'संघर्ष', 'दिल्लगी', 'क्या कहना', 'दिल चाहता है', 'वीर जरा' यांसह अनेक चित्रपटांमध्ये काम करून चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. प्रीती 2018 साली 'वेलकम टू न्यूयॉर्क'मध्ये दिसली होती. याशिवाय तिनं 2007 मध्ये 'झूम बराबर झूम' मध्ये अभिषेक बच्चनबरोबर स्क्रिन शेअर केली होती. तसेच तिनं शाहरुख खान स्टारर 'ओम शांती ओम'मध्ये कॅमिओ केला होता. त्यानंतर 2008 ते 2018 पर्यंत तिनं अनेक चित्रपटांमध्ये विशेष भूमिका केल्या होत्या.

हेही वाचा :

  1. रणवीर सिंह डिप फेक व्हिडिओ प्रकरण : व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल, पोलिसांनी पाठवली नोटीस - Ranveer Singh Deep fake Video
  2. 'कुली'साठी रजनीकांतनं घेतलं 300 कोटींचं मानधन, ठरला आशियातील सर्वात महागडा स्टार? - Rajinikanth
  3. मनोज बाजपेयीच्या वाढदिवसानिमित्त 'भैय्या जी'मधील 'बाग का करेजा' गाण्याचा टीझर रिलीज - manoj bajpayee birthday

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.