ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोण फॅमिली डिनर डेटवर आईबरोबर झाली स्पॉट, दिसली चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक - Pregnant Deepika Padukone - PREGNANT DEEPIKA PADUKONE

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण शनिवारी रात्री फॅमिली डिनर डेटवर स्पॉट झाली. आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्टपणे दिसून येत आहे.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण (दीपिका पदुकोण फोटो (ANI Photo))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 7:54 PM IST

मुंबई - Deepika Padukone : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दरम्यान रणवीर सिंग अनेकदा आपल्याची पत्नीची काळजी घेताना दिसतो. दीपिका गरोदरपणात तिच्या आईबरोबर असते. गेल्या शनिवारी दीपिका मुंबईत फॅमिली डिनर डेटवर गेले होती, तेव्हा तिनं आपल्या आईबरोबर काही सुंदर क्षण घालवले. दीपिका पदुकोण नुकतीच फॅमिली डिनर एन्जॉय करताना स्पॉट झाल्यानंतर तिला आता तिचे चाहते बाहेर न खाण्याचा सल्ला देत आहेत. दीपिकाचा एक व्हिडिओ प्रचंड वेगानं व्हायरल झाला आहे, ज्यावर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

दीपिका पदुकोण गेली फॅमिली डिनर डेटला : दीपिका शनिवारी संध्याकाळी वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसली. तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्ट दिसत होती. फ्लोरल टॉप आणि जीन्समनध्ये दीपिका ही खूप सुंदर दिसत होती. यावेळी तिनं केस बनमध्ये बांधले होते. दीपिकाचा हा स्टायलिश लूक अनेकांना आवडत आहे. व्हिडिओमध्ये दीपिकाचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. दरम्यान यावर्षी 29 फेब्रुवारीला दीपिका आणि रणवीर सिंगनं प्रेग्नंसीची घोषणा केली होती. या जोडप्यानं सांगितलं होतं की, त्यांना पहिलं बाळ होणार आहे. दीपिकाला सप्टेंबरमध्ये बाळ होत असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या जोडप्यानं सहा वर्षे डेटिंग केल्यानंतर 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीतील लेक कोमो येथे लग्न केलं होतं.

दीपिका पदुकोणचं वर्क फ्रंट : दीपिका आता रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती लेडी सिंघमची भूमिका साकारणार आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांसारखे स्टार्स देखील असणार आहेत. तसेच दीपिका ही अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास आणि दिशा पटानी यांच्याबरोबर 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या रिलीजच्या तयारी आहे. सध्या हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये दीपिकाचा वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाणार आहे.

हेही वाचा :

  1. पनवेल फार्महाऊसबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी सलमान खानच्या फॅनगर्लला घेतलं पोलिसांनी ताब्यात - Salman Khan fan girl
  2. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमधील शाहरुख खान आणि रणबीर कपूरचा क्रूझवरील व्हिडिओ व्हायरल - Anant Radhika Pre Wedding
  3. रवीना टंडनवर दारूच्या नशेत वृद्ध महिलेवर हल्ला केल्याचा आरोप, लोकांनी रस्त्यावर घेरलं - RAVEENA TANDON

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.