मुंबई - Prabhas Raja Saab teaser release date : पॅन इंडियाचा सुपरस्टार प्रभास त्याच्या अलीकडील ब्लॉकबस्टर 'कल्की 2898 एडी'च्या यशाचा आनंद घेत आहे. आता त्याचा आगामी 'राजा साब' चित्रपटही बऱ्याचं दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच या चित्रपटामधील एक पोस्टर रिलीज झालं होतं. चाहत्यांना हे पोस्टर खूप आकर्षक वाटलं होतं. या पोस्टरमध्ये प्रभास हा लुंगी स्टाईलमध्ये दिसला होता. आता निर्मात्यांनी 'राजा साब'च्या टीझरची रिलीज तारीखसह आणखी एक पोस्टर जारी केलं आहे. निर्मात्यांनी जाहीर केले की, या चित्रपटाचं टीझर 29 जुलै रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन मारुती यांनी केलं आहे.
Vare Vare Vare Vare Vachesadu Raja Saab 🥁🥁
— The RajaSaab (@rajasaabmovie) July 28, 2024
The beloved darling we all cherish is coming back... Inka Shake ey 🕺🕺#TheRajaSaab 𝐅𝐀𝐍 𝐈𝐍𝐃𝐈𝐀 𝐆𝐋𝐈𝐌𝐏𝐒𝐄 tomorrow at 5:03PM 🔥🔥
#Prabhas @DirectorMaruthi pic.twitter.com/rEKmwAB4Os
निर्मात्यांनी खास पद्धतीनं नवीन पोस्टर केलं शेअर : फॅन इंडिया झलक या शीर्षकासह प्रभासच्या 'राजा साब'चा टीझर चाहत्यांना लवकरच पाहायला मिळणार आहे. व्हायरल झालेल्या पोस्टरमध्ये निर्मात्यांनी प्रभासला स्टायलिश लूकमध्ये दाखवले आहे. या पोस्टरचे अनेकजण कौतुक करताना दिसत आहे. पोस्टरमध्ये प्रभास मरून जॅकेट आणि सनग्लासेस घालून फुलांनी सजवलेल्या जुन्या कारकडे झुकत आहे. पोस्टरवर लिहिलं आहे की, "राजा साब'ची पहिली झलक 29 जुलै रोजी संध्याकाळी 5:03 वाजता प्रदर्शित होईल." चित्रपटाची निर्मिती टीजी विश्व प्रसाद यांनी केली आहे. याशिवाय 'राजा साब'ला संगीत थमन एस यांनी दिलंय.
प्रभासचे आगमी चित्रपट : 'राजा साब' चित्रपटाचं व्हिएफएक्स खूप जबरदस्त असणार असल्याचं बोललं जात आहे. हा चित्रपट हॉरर आणि कॉमेडी असेल. या चित्रपटात प्रभासची हेअर स्टाईल ही आकर्षक असणार आहे. यात प्रभासशिवाय मालविका मोहनन आणि निधी अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.'राजा साब' हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'राजा साब' चित्रपट 2025 च्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं 'कल्की 2898 एडी'मध्ये धमाकेदार अभिनय केला आहे. आता पुढं प्रभास दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'स्पिरिट' ॲक्शनपटही दिसणार आहे. या चित्रपटात तो पोलिसाची भूमिका साकारू शकतो. तसेच तो 'सालार: पार्ट 2' आणि 'कन्नप्पा'मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :