ETV Bharat / entertainment

साजिद नाडियाडवालाच्या 'सनकी' चित्रपटात दिसणार सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी - sajid nadiadwala Rom Com sanki

Pooja Hegde and Ahan Shetty : सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीला त्याच्या पहिल्या चित्रपटानंतर तीन वर्षांनी आणखी एक चित्रपट मिळाला आहे. या चित्रपटात तो पूजा हेगडेच्या बरोबर रोमान्स करताना दिसणार आहे.

Pooja Hegde and Ahan Shetty
पूजा हेगडे आणि अहान शेट्टी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 4:52 PM IST

मुंबई - Pooja Hegde and Ahan Shetty : अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी हा पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. त्याचा डेब्यू चित्रपट 'तडप' (2021) बॉक्स ऑफिसवर काही खास काम करू शकला नव्हता. आता तीन वर्षांनंतर अहान शेट्टी आणखी एक चित्रपटातून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. अहान शेट्टी 'सनकी' चित्रपटामध्ये दिसणार आहे. आज 9 मार्च रोजी 'सनकी' चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'सनकी'मध्ये अहान हा साऊथ अभिनेत्री पूजा हेगडेबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे.

अहान शेट्टी स्टारर 'सनकी' चित्रपट : नाडियाडवाला ग्रँडसननं आपल्या ऑफिशियल पेजवर 'सनकी'बद्दल घोषणा करून यातील स्टारकास्टबद्दलची माहिती दिली आहे. 'सनकी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्यापही समोर आलेली नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन अदनान शेख आणि यासिर शाह करणार आहेत. 'सनकी' चित्रपटाची कहाणी रजत अरोरा यांनी लिहिली आहे. हा एक प्रेम-रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. 'सनकी'कडून अहानला खूप अपेक्षा आहेत. अहान शेट्टी हा अनेक दिवसांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत एका चांगल्या प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत होता. 'सनकी'ची घोषणा झाल्यानंतर सुनील शेट्टी हा खूप खूश झाला असून त्यानं आपला आनंद सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Pooja Hegde and Ahan Shetty
पूजा हेगडे आणि अहान शेट्टी

सुनील शेट्टीनं शेअर केली पोस्ट : सुनील शेट्टी शेअर केलेल्या पोस्टवर लिहिलं, ''चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे येतात, ज्यांच्याकडे संयम असतो. कारण तेच प्रतीक्षा करतात. 'सनकी'च्या घोषणेबद्दल अभिनंदन बेटा. तुझी चिकाटी वाखाणण्याजोगी आहे. मला अभिमान वाटत आहे. या रोमांचक प्रवासासाठी तुला शुभेच्छा देण्याशिवाय माझ्याकडे दुसरे काहीही नाही!'' आता सुनील शेट्टीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका चाहत्यांना अहान शेट्टीला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय काही चाहते या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.

हेही वाचा :

  1. सारा अली खान स्टारर 'ए वतन मेरे वतन' चित्रपटामधील 'कतरा कतरा' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ
  2. मलायका अरोराला घरी सोडण्यासाठी गेला अर्जुन कपूर, व्हिडिओ व्हायरल
  3. 96th Academy Awards: ऑस्कर 2024 मध्ये लक्ष वेधू शकतील अशा पाच गोष्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.