ETV Bharat / entertainment

तापसी पन्नू ,विक्रांत मॅसी आणि सनी कौशल स्टारर 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - PHIR AAYI HASSEEN DILLRUBA - PHIR AAYI HASSEEN DILLRUBA

Phir Aayi Hasseen Dillruba Trailer OUT : तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि सनी कौशल स्टारर 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा थरारक ट्रेलर आज रिलीज झाला आहे. यावेळी या कहाणीत विक्रांतचा थरारक अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Phir Aayi Hasseen Dillruba Trailer OUT
फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर आऊट (फिर आई हसीना दिलरुबा (Movie Poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 1:13 PM IST

मुंबई - Phir Aayi Hasseen Dillruba Trailer :अभिनेत्री तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि सनी कौशल अभिनीत रोमँटिक थ्रिलर चित्रपट 'फिर आयी हसीना दिलरुबा'चा आज 25 जुलै रोजी ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या रिलीजची वाट अनेकजण पाहात आहेत. 'फिर आयी हसीना दिलरुबा'चा ट्रेलर प्रेम, विश्वासघात आणि नंतर खूनाच्या रहस्यानं भरलेला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 'फिर आयी हसीना दिलरुबा' हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटाचा पहिला भाग हा चाहत्यांना खूप आवडला होता. 'हसीना दिलरुबा' चित्रपटामध्ये तापसी पन्नूचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला होता.

'फिर आयी हसीना दिलरुबा'चं ट्रेलर रिलीज : आता 'फिर आयी हसीना दिलरुबा'मध्ये तापसी पन्नू पुन्हा एकदा हत्येचे गूढ उकलण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन जयप्रद देसाई यांनी केलं आहे. तापसीची बोल्ड स्टाईल आणि विक्रांत मॅसीची खुनी भूमिका आणि एक निष्पाप व्यक्ती म्हणून सनी कौशल या चित्रपटामध्ये दिसणार आहे. रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये विक्रांत मॅसी हा त्याच्या थरारक अंदाजात दिसत आहे. याशिवाय यावेळी या चित्रपटामध्ये अभिनेता जिमी शेरगिल देखील पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

रक्तरंजित खेळ : 'फिर आयी हसीना दिलरुबा'च्या ट्रेलरबद्दल सांगायचं झालं तर, सुरुवातीपासूनच तापसी आणि विक्रांतचे प्रेम ट्रेलरमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये सनी कौशल एंट्री करतो. यानंतर, एक रक्तरंजित खेळ सुरू होतो आणि जिमी शेरगिल त्याच्या पुतण्याच्या मृत्यूबद्दल तापसीची वैयक्तिक चौकशी करतो. या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, हिमांशू शर्मा, कृष्ण कुमार, शिव चन्ना आणि आनंद एल राय आहेत. 'फिर आयी हसीना दिलरुबा'चा सीक्वेल तीन वर्षांनी येत आहे. आता पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांची मोठी गर्दी होणार आहे. कारण यावेळी 'फिर आयी हसीना दिलरुबा'मधील खुनी खेळ खूप भितीदायक असणार आहे. 'फिर आयी हसीना दिलरुबा' चित्रपटाची कहाणी कनिका ढिल्लननं लिहिलंय. याशिवाय त्या या चित्रपटाच्या सहनिर्मात्या देखील आहेत.

हेही वाचा :

  1. 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा ट्रेलर होईल उद्या प्रदर्शित, पोस्ट व्हायरल - PHIR AAYI HASSEEN DILLRUBA Movie
  2. तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसी आणि सनी कौशल स्टारर 'फिर आयी हसीन दिलरुबा'चं नवीन पोस्टर रिलीज - PHIR AAYI HASSEEN DILLRUBA POSTER

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.